मनमाड स्टेशनवर तिकीट तपासणी

भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वे, भुसावळ विभागातील मनमाड स्टेशनवर किल्ला तिकीट तपासणी मोहिम राबविण्यात आली . या मोहिमेत एकूण १ लाख ६८ हजार ४७५ रुपये दंड वसूल करण्यात आला .
भुसावळ विभागाच्या मनमाड स्टेशनवर विना टिकट व अयोग्य तिकीट रोखण्यासाठी शनिवार २२ रोजी किल्ला बंद तिकिट तपासणी केली.
ही तपासणी कारवाई भुसावळ विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक .के.के. शर्मा आणि सहाय्यक व्यवसाय व्यवस्थापक अजय कुमार (टी. जाजा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून मनमाड स्थानकावरील तिकिट तपासणीसाठी एकूण २३ तिकीट तपासणी पथके आणि पाच आरपीएफ कर्मचारी होते. यावेळी २६२ प्रवासी अनियमित प्रवास करत असल्याचे आढळून आले.या प्रवाशांकडून दंड म्हणून एकूण १,६८,४७५ / – रुपये वसूल करण्यात आले.या मोहिमेमध्ये विना तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्यां ८७ केसेस करण्यात आल्या आहेत. त्यांचे कडून ७६०६० / – दंड, तसेच १७५ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येवून ९२ हजार ४१५ रुपये दंड वसुल केला तसेच २ प्रवश्याविरुद्ध कलम १४५ ब नुसार कारवाई करण्यात आली .या मोहिमेमध्ये वाय.डी. पाठक (मुख्य तिकिट निरीक्षक तपासणी) यांच्यासह एटीएस पथक, फिर्यादी पथक, आयसीपी चेक, सजनांग पथक, ओडी स्टाफ आणि इतर तिकिट तपासणी कर्मचारी उपस्थित होते .रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना नेहमीच योग्य तिकिट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *