सॅम मॅम यादीतील विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी संघटना सरसावल्या : महाराष्ट्रातला पहिलाच प्रयोग भुसावळ तालुक्यात :


प्रतिनिधी भुसावळ
1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून घोषित करण्यात आला आहे या महिन्यात बालकांमधील पोषणाविषयीची जनजागृती करणार आहे परंतु भुसावळ तालुक्यात 13 जिल्हा परिषद शाळेमधील 21 विद्यार्थी अंगणवाडीमध्ये सॅम मॅम यादीत होते या विद्यार्थ्यांचे पोषण व्हावे यासाठी भुसावळ तालुक्यातील संघटनांनी पुढाकार घेऊन सहा महिने पोषण आहार दिला जाणार आहे यामुळे या विद्यार्थ्यांचे कुपोषण कमी करण्यावरती भर असणारा असून महाराष्ट्रातील हा भुसावळ मधील पहिलाच प्रयोग होणार आहे
नुकतेच जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार 3944 अंगणवाडीमध्ये 1889 अति तीव्र तर 7326 सौम्य कुपोषित बालक आढळले आहेत तर एक सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत राष्ट्रीय पोषण महिना म्हणून पोषण आहारासाठी जनजागृती करण्यात येणार आहे मागील वर्षाच्या यादीत भुसावळ तालुक्यात अंगणवाडीत असताना 21 मुले ही सॅम मॅम यादीत होती आता ती जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला असून या विद्यार्थ्यांचे शालेय पोषण आहारासोबतच त्यांना पूरक आहार मिळावा यासाठी शालेय पोषण आहार अधीक्षक अजित तडवी व गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी भुसावळ तालुक्यातील संघटनांसोबत चर्चा केली व सॅम मॅम यादीतील विद्यार्थ्यांचे कुपोषण कमी करण्यासाठी लोकसहभागाची संकल्पना मांडली यावेळी जवळपास 22 संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या 21 विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतली एक सप्टेंबर ते 31 मार्च पर्यंत 153 दिवस प्रतिदिन सहा रुपये याप्रमाणे 918 रुपये एका विद्यार्थ्यासाठी धनादेश देण्यात आला 21 विद्यार्थ्यांना 19 हजार 278 रुपये निधी वाटप करण्यात आला असून अंडी, गुळ शेंगदाणे, राजगिरा यासह इतर पोषण आहार प्रति दिवसाला सहा रुपये खर्च होईल दिला जाणार आहे या धनादेशाचे वाटप करण्यात आले

गटसाधन केंद्रातील सभागृहामध्ये धनादेश वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे होते यावेळी शालेय पोषण अधीक्षक अजित तडवी शिक्षण अधिकारी तुषार प्रधान बी डी धाडी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे पी सपकाळे आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान जाधव यांनी तर आभार आर आर धनगर यांनी केले

यांनी केली मदत
जे पी सपकाळे एस एस अहिरे आर आर धनगर सुनील वानखेडे प्रदीप साखरे देवेंद्र तायडे राजेंद्र ढाके गणेश फेगडे समाधान जाधव प्रमोद खैरे मीरा जंगले प्रदीप सोनवणे गणेश लोखंडे भूषण झोपे विनय भोगे प्रमोद गांधेले अतुल पाटील राजेंद्र सुरवाडे ललित फेगडे नितीन भालेराव तुकाराम सोनवणे विनोद पाठक यांनी या कार्यासाठी आर्थिक योगदान दिले
मुख्याध्यापकांवर जबाबदारी
सॅम मॅम यादीतील विद्यार्थ्यांचे कुपोषण राहू नये यासाठी शासन स्तरावर मागणी केली आहे परंतु लोकसहभागातून आत्तापासूनच आपण या विद्यार्थ्यांकडे लक्ष देणार आहोत यासाठी भुसावळ तालुक्यातील शिक्षक संघटनांनी आर्थिक स्वरूपात मदत केली आहे आता महत्त्वाची जबाबदारी ही मुख्याध्यापकावर आहे विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार नियमित द्यावा
अजित तडवी अधीक्षक शालेय पोषण आहार

प्रशासन व संघटन यांच्यातील समन्वयामुळे शक्य
सर्वच गोष्टी या शासन स्तरावर होत नसतात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असते यामुळे या विद्यार्थ्यांचे कुपोषण कायम राहू नये यासाठी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन केले असता सकारात्मक प्रतिसाद देत अवघ्या दोन दिवसांमध्ये आर्थिक मदत केली यामुळे प्रशासन व संघटना यांचा समन्वय तालुक्यात चांगला आहे आणि हा उपक्रम तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील पहिला असावा हे केवळ प्रशासन व संघटना यांच्यातील चांगल्या समन्वयामुळे शक्य झाले
किशोर वायकोळे गटशिक्षणाधिकारी