उद्या रानातला महादेव मंदिर येथे ११००० दिव्यांचे भव्य प्रज्वलन कार्यक्रम.


भुसावळ – संकल्प जगाच्या कल्याणासाठी अंतर्गत दीप प्रज्वलनाचा भव्य कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आयोजित करण्यात आलेला आहे गजानन कॅटर्सचे संचालक विनोद पाटील व अतुल पाटील हे मागील पाच वर्षापासून अकरा हजार दिव्यांचे भव्य प्रज्वलन कार्यक्रम आयोजित करीत असतात यावर्षी शके १९४५ शोभना मसंवत्सर निज श्रावण शुक्लपक्ष १२ सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी करण्याचे ठरविले आहे भाविकांनी या धार्मिक व भव्य दिव्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सोमवारी सायंकाळी सात वाजता जामनेर रोड रानातला महादेव मंदिर येथे हजर रहावे अधिक माहितीसाठी विनोद पाटील ९८२३६५५३६४ यांच्याशी संपर्क साधावा समस्त शिवभक्त परिवाराच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे पावसामुळे व्यत्यय आल्यास सदर कार्यक्रम 4 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित केला जाईल असे आयोजकांनी कळविले आहे