भुसावळ(प्रतिनिधी )-
येथे महाशिवरात्री निमित्ताने आयोजित केला जाणारा दरवर्षी प्रमाणे नुपूर महोत्सव शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाला. कृष्णचंन्द्र सभागृहात सायंकाळी सात वाजता महोत्सवाचे उद्घाटन मधुकर गोडबोले, अंशुमन गुप्ता, या मान्यवरांच्या हस्ते नटराजपुजन आणि दिपप्रज्वलनाने झाले. हे या महोत्सवाचे तेविसावे वर्षा होते .या वेळी कथकली नृत्य कलावंत अंशुमन गुप्ता ( कोलकाता ) यांना शाल,श्रीफळ व मानपत्र देऊन नृत्यश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच बरोबर मणीपुरी नृत्यांगना अनिंदिता मंडल ( कोलकाता ) यांना हि शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देउन गौरविण्यात आले. यावेळी प्रास्तावीकात नुपूर कथक डान्स अॕकेडमी चे संचालक रमाकांत भालेराव यांनी उपक्रमांची माहीती देतांना निश्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे घोषित केली.या वेळी रंगभूषा- सीमा चिव्हाणे, वेशभूषा- सुजाता ईंगळे,कांचन जोशी तसेच सुत्रसंचालक गिरीष जोशी व तबल्यावर साथ करणारे शिरीष जोशी व संवादिनीवर साथ करणारे स्मिता कुळकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रत्यक्ष सादरीकरणास सुरुवात झाली.यात सुरुवातीला पंचम सवारी या प्रकारात प्रचिती कुळकर्णी , मंजिरी चिव्हाणे,हिमांशु जावळे यांनी कथक नृत्य सादर केले.नंतर नियति राणे, उर्वशी कोळी, वैष्णवी कुंभार यांनी कथक नृत्यातील झपताल सादर केला. त्यांना तबल्यावर शिरीष जोशी तर संवादिनीवर स्मिता कुळकर्णी यांनि तर पढंत चारु भालेराव यांनि केले. नंतर डम डम डमरु बजे या गाण्यावर सुभाषिनी चडार,नुपूर भालेराव , अवनी धाडसे,पियाली चौधरी, भार्गवी उंबरकर, कनिका नेमाडे, खूषि बेदरकर, जान्हवी खाडवे,तृप्ती गुप्ता,त्रिशा माथुर, आर्या दिनेश, आरोही कोळी यांनी नृत्य सादर केले. यानंतर अनंदिता मंडल ( कोलकाता ) यांनी मणीपुरी प्रकारात मंगलाचरण सादर करुन रसिकांची दाद मिळवली. नंतर हरि सुंदर नंद मुकुंदा.. या गाण्यावर रूत्वी भिरुड, रिधीमा चौधरी, अंशु वडनेरे, हेमांगी पंढागरे,चंद्रजा ईंगळे,साईश्री गुंटीवार,मान्यता गुप्ता, दक्षा चौधरी यांनी नृत्य सादर केले. यानंतर नृत्यशिक्षिका चारु भालेराव यांच्यासोबत अनुष्का फलटणकर व डिंपल गाढे यांनी डमरु डम डम बाजे ही शिवस्तुती सादर केली. तर सारिका पाटील,निलम धाडसे, सिमा पाठक.श्रावणी जोशी,दिशा महाजन यांनी बाजत मृदंग अंग तरंग यावर नृत्य सादर केले.नुपूर भालेराव ने तराना सादर करुन रसिकांची दाद मिळवली. धिमिक धिमिक धीम यावर भुमिका इदा,प्रगती सिंग,तोषवी फेगडे, दिती चिमणकर,प्रकृती गुप्ता,दिव्यांजली पाटील,अनुष्का राय,तनिशा सुरवाडे, हृदया नागपुरे यांनी नृत्य सादर केले.यानंतर मणिपुरी नृत्यप्रकारात अनंदिता मंडल यांना राधा नर्तन सादर केले. यानंतर महोत्सवाचे आकर्षण असलेले अंशुमन गुप्ता यांनी पुतना मोक्षम सादरकरुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.शेवटी गंगा वहशिनीशम या संस्कृत गाण्यावर पाहुणे कलाकारांसोबत सहभागी सर्व कलावंताचे नृत्यातुन एकत्रीकरण करुन राष्ट्रगिताने महोत्सवाची सांगता झाली. यावेळी भुसावळकर रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रम यशस्वितेसाठी शंभु गोडबोले, शुभम कुळकर्णी , प्रांजल कुळकर्णी , उदय जोशी,कांचन जोशी, सुजाता ईंगळे, सिमा चिव्हाणे , मदन चीव्हाणे,किशोर राणे, उमेश जोशी, किशोर चिंचोले,सी.के.पाटील, निशिकांत चौधरी,राजेश पाटील, आशिष कुळकर्णी , शंभु मेहेंदळे, शशिकांत गोरवाडकर,विजय कोळी आदिंनी परिश्रम घेतले.सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन गिरीष कुळकर्णी याःनि केले. कथक ,मणिपुरी व कथकली तीनही शास्त्रीय नृत्यप्रकार या महोत्सवात अनुभवायला मिळाल्याने रसिक मंत्रमुग्ध होउन संगित रसात चिंब झाले हे मात्र खरे .



