परदेशी समाज बांधवांची बम बम भोले च्या गजरात महाशिवरात्री साजरी

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील शनी मंदिर वार्डात सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्री परदेशी समाज बांधवांनी साजरी केली.
75 वर्षापूर्वीच्या पुरातन शिव मंदिरात सकाळी परिसरातील शिव भक्तगणांनी शिवजीच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करून पूजा अर्चा केली.नंतर होम करण्यात आला.दुपारी 12 वाजेच्या सुमारास होम झाल्यानंतर शिवजींची आरती झाली.भक्तगणांना प्रसाद वाटप करण्यात आला.तर मंदिराच्या शेजारी कढई मध्ये “बम बम भोले” चा प्रसाद म्हणून दूध शिव भक्त यांना वाटप करण्यासाठी तयार करीत होते. २१ शुक्रवार रोजी
सायंकाळी शनी मंदिर वार्डातुन बाल-गोपाळ,महिला,पुरुष महादेवाची पिंडीचा देखावा करून मिरवणूक काढतात.ही मिरवणूक डेली मार्केट मधील तेली मंगल कार्यालया जवळील महाकालेश्वर मंदिरा मध्ये येऊन शिवजींची पूजा करून पुन्हा शनी मंदिर वार्डात जाते.त्यानंतर मंदिरामध्ये रात्रभर भजन सुरू असते. या दरम्यान भक्तगणांना दूध प्रसाद म्हणून दिले जातें
.पुराणकालीन शिव मंदिराची पूजा रोहित शर्मा हे करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *