मीडियाचे फोटोग्राफर तर्फ जागतीक फोटोग्राफी दिवस उत्साहात साजरा :

भुसावळ – येथिल श्री.छत्रपती शिवाजी महाराज संकुलात मीडियाचे फोटोग्राफर तर्फ जागतीक फोटोग्राफी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रसंगी जुने व नवीन कॅमेरांचे पुजन करण्यात आले.विनोद गोरधे,गोपी म्यांद्रे यांनी कॅमेरा पुजन केले.

यावेळी मीडियाचे फोटोग्राफर कमलेश चौधरी, हबीब चव्हाण, संतोष शेलोडे,कालू शहा,कलीम
पायलट,वसीम शेख,राहुल वानखेडे,सद्दाम खाटीक,निलेश फिरके,गोपी म्यांद्रे,विनोद गोरधे
आदींची उपस्थिती होती.

विनोद गोरधे यांनी फोटोग्राफर बांधवांना मनोगत व्यक्त केले.सुत्र संचालन हबीब चव्हाण यांनी तर आभार कमलेश चौधरी यांनी मानले,कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल वानखेडे सह फोटोग्राफरांनी परिश्रम घेतले.