स्वातंत्रदिन चिरायू होवो ! झेंडा उंचा रहे हमारा , विजयी विश्व तिरंगा प्यारा !भुसावळ व परिसरात ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा :


भुसावळ – भारतीय स्वातंत्र दिन ७७ व्या स्वातंत्रदिन शहर व परिसरात शासकीय , निमशासकीय कार्यालये विविध राजकीय पक्ष कार्यालय, शाळा महाविद्यालय , नगरपरिषद, ग्राम पंचायत , यासह सेवाभावी संस्थानी मोठया उत्साहात व आनंदाने साजरा केला .
मुख्य शासकीय ध्वजारोहण :
भुसावळ शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रांगणावर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६’व्या वर्धापनदिना निमित्त शासकीय
ध्वजारोहण करण्यात आले . प्रसंगी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी पोलिस विभागीय अधिकारी कृष्णांत पिंगळे,मुख्याधिकारी महेश वाघमोडे, चोपडा तहसीलदार भुसावळ नायब तहसीलदार , यांच्यासह शासकीय कार्यालयीन अधिकारी उपस्थित होते .
प्रसंगी शासकीय -निमशासकीय, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालय,विविध राजकीय पक्ष यासह विविध सेवाभावी संस्था , संघटनांतर्फे राष्ट्रध्वजास उत्साहात व आनंदाने मानवंदना देण्यात आली . भारतीय सेनेत वीरगती प्राप्त शहिदांच्या कुटुंबियांना आमदार सावकारेंच्या हस्ते मानचिन्ह देण्यात आले
भुसावळ पालिकेचा गुणानुक्रम वाढवण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने नवीन खरेदी केलेल्या कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या,JCB, मिनी ट्रॅक्टर,आदी खरेदी केलेल्या वाहनांचे आमदार सावकारे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले .