भुसावळ
(प्रतिनिधि )भुसावळ मराठा समाजा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होतयात सजिव देखावे,घोडे,लेझीम पथक आणि झांझ पथक या द्वारे सुंदर अशी मिरवणुक काढण्यात आली होती.शिवाजी नगर पासून मिरवणुकीला सुरवात करुन समारोप शिवाजी महाराज पुतळा टिंबर मार्केट येथे करण्यात आलायात सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीला सुरवात करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मुर्तीचा एक बैठकी आणि ताप्ती पब्लिक स्कूल तर्फे महाराजांचं मंत्रिमंडळ हा सजीव देखावा दोन करण्यात आले होते. मिरवणुकीत पारंपारिक पद्धतचे झांज पथक लेझीम ढोल पथक यांच्या माध्यमातून वातावरण निर्माण झाले.ताप्ती पब्लिक स्कुलच्या विद्यार्थी यांनी शिवकालीन वेशभूषा करुन डोळ्यांचे पारणे फेडले.भुसावळ शहरातील शिव प्रेमी आणि मराठा समाज बांधव यांची मोठ्या प्रमाणात मिरवणुकीत उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मराठा समाजातर्फे विविध स्पर्धा आणि कार्यक्रम राबविण्यात आले होते.त्यात रांगोळी,निबंध,चित्रकला स्पर्धा,उत्कृष्ट वेषभूषा.मोफत रक्तगट तपासणी शिबिर, मुखरोग तपासणी शिबिर घेण्यात आले होते.या सर्व उपक्रमाना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता मिरवणुकीचा समारोपा वेळी जयंती निमित्ताने आयोजीत स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.त्यात रांगोळी,चित्रकला,निबंध आणि उत्कृष्ट आरस,वेषभूषा यात प्रत्येकी प्रथम,द्वितीय आणि तृतीय यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले.मराठा समाजातील सर्व श्रेष्ठ,ज्येष्ठ आणि तरुण सदस्य,महिला यांनी सदर मिरवणुकीसाठी परिश्रम घेतले.




