भुसावळ : जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील संशयिताला गावठी पिस्टलासह पकडल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई सोमवार, १२ जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास झेडटीएस भागात करण्यात आली. सागर बबन हुसळे (२६ भगवान सावळे नगर, भुसावळ) यास संशयितास अटक केली आहे.

जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांना भुसावळातील संशयिताकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर संशयिताला फेकरी शिवारातील झेडटीएस भागातून अटक करण्यात आली. संशयिताच्या अंग झडतीत 20 हजार रुपये किंमतीचे पिस्टल आढळल्याने ते जप्त करण्यात आले.


