महिलांसाठी शौर्य प्रशिक्षण अभ्यास वर्ग संपन्न : दुर्गा वाहिनी व मातृ शक्तीचा स्तुत्य उपक्रम :

:
भुसावळ – येथील संतोषी माता सभागृह येथे रविवाारईई महिला व तरुणी साठी एक दिवसीय शौर्य प्रशिक्षण अभ्यास वर्गाच्या आयोजन करण्यात आले होते
विश्व हिंदू परिषद यांच्या सहकार्याने दुर्गा वहिनी व मातृ शक्ती यांनी या एक दिवशी शौर्य प्रशिक्षण अभ्यास वर्गाच्या आयोजन केले यात दंड,छुरिका,
नियुद्ध ,समता, नित्यकाल याचे प्रात्यक्षिक सर्व दुर्गांनी करून दाखविले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली मंचावर श्रीकांत लाहोटी भुसावळ जिल्हा प्रमुख विश्व हिंदू परिषद, कैलास गायकवाड प्रांत मठ मंदिर प्रमुख ,ॲड.जास्वंदी भंडारी (पाटील) भुसावळ जिल्हा महिला समन्वय प्रमुख, सौ रजनी सावकारे, ॲड. स्नेहल विसपुते दुर्गा वहिनी जिल्हा संयोजिका उपस्थित होते .
महिलांचे मनासोबतच मनगट मजबूत असले पाहिजे तर स्री अत्याचार विरोधात स्वरक्षणासाठी उभी राहू शकतात आणि हेच काम दुर्गा वाहिनी करते असे स्नेहल विसपुते यांनी सांगितले
दुर्गा वहिनीचे या रोपाचे रूपांतर वटवृक्षांमध्ये भुसावळ मध्ये लवकरच होईल असे रजनीताईं सावकारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले
महिलांना तरुणींना कशाप्रकारे फसवले जात आहे कसा त्यांचा उपभोग घेऊन कशी त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी होत आहे आपण बघतच आहोत महिलांनी स्वरक्षणासाठी जागृत होऊन आता स्वरक्षणांचे धडे घेण्याची वेळ आली आहे असे कैलास गायकवाड यांनी यावेळी सांगितले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दोन दुर्गांनी छान पोवाडा सादर केला माधुरी सोनवणे हीने प्रेरणादायी असे गीत सादर केले वेदिका परळकर हिने प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी चौधरी यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन आयोजन व्यवस्थित केल्याबद्दल व सदर प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहिलेल्या महिला व तरुणींचे आभार ॲड. जास्वंदी भंडारी यांनी मानले सदर प्रशिक्षण वर्ग यशस्वी होण्यासाठी जिल्हा सहमंत्री विनोद उबाळे, दीपक जावळे ,दिलीप कलाल ,गणेश वाणी, रोहित महाले यांनी परिश्रम घेतले सदर प्रशिक्षण वर्गासाठी विविध संघटनांचे प्रमुख, महिला व तरुणी उपस्थित होते