भुसावळ – मेजर्स स्पोर्टस क्लब व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व मुलींसाठी कराटे प्रशिक्षण व सेल्फ डिफेन्स शिबीर संपन्न झाले .

सध्याच्या काळात मुलींवरील अत्याचार किंवा इतर घटना पाहता मुलीने आपले स्वत:चे रक्षण करणे ही स्वत:चीच जबाबदारी आहे हे समजून आत्मनिर्भर, धीट होणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठीच मेजर्स स्पोर्ट्स क्लब व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व मुलींसाठी दोन दिवसीय मोफत कराटे प्रशिक्षण व सेल्फ डिफेन्स शिबीर आयोजित भगीरथ इंग्लिश मिडीयम स्कूल सानेगुरुजी कॉलनी येथे सायंकाळी सहा ते साडे सात या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने महिला व मुली यांनी सहभाग घेतला व स्वत:च्या आत्मरक्षणाचे व संरक्षणाचे धडे घेतले. नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव अध्यक्ष सौ मनीषा पाटील यांनी मुली व महिला यांना सुदृढ व्यक्तीमत्व यावर मार्गदर्शन केले मेजर्स स्पोर्ट्स क्लब चे प्रशिक्षक श्री अनंत सोनवणे यांनी कराटेचे प्रशिक्षण देऊन प्रात्यक्षिक करून घेतले. व समन्वयक श्री विशाल मोरे यांनी सर्व व्यवस्था केली. सूत्रसंचालन नीता विसावे यांनी केले याप्रसंगी नूतन खेडकर, किमया पाटील, रेणुका हिंगु, भाग्यश्री महाजन, हर्षा गुजराती, मीनाक्षी शेजवाळे हर्षाली तिवारी हे उपस्थित होते.


