भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सुनसगाव गावाजवळील सुदर्शन पेपर मिलला रविवारी सकाळी भीषण आग लागली. पाहता पाहता आगीचा विळखा संपूर्ण मिलमध्ये पसरल्यानंतर विविध भागात आगीचे लोण पसरल्याने कोट्यवधींची हानी झाली. आग विझवण्यासाठी भुसावळसह जळगाव जिल्ह्यातून अग्निशमन दलालाल पाचारण करण्यात आले आहे.
सध्या उन्हाळ्याचा कडाका अधिकच वाढला असताना पेपर मिलला आग लागल्याने खळबळ उडाली आहे. आगीचे नेमके कारण अस्पष्ट असून घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्यासह तालुका पोलिसांनी धाव घेतली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत आगीचे कारण व नुकसानीचा आकडा समारे येणार आहे.



