भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल नीरसोबत अन्य नऊ उत्पादनांच्या पाणी बॉटल विक्रीला परवानगी –

भुसावळ : भुसावळ रेल्वे स्थानकावर आता रेल नीर व्यतिरीक्त अन्य नऊ उत्पादनांच्या पाणी बॉटल विक्रीला परवानगी मिळाल्याने विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली असून पाण्याची मागणी वाढली आहे मात्र मागणीच्या तुलनेत रेल नीरचा पूर्ण पुरवठा होत नसल्याने गैरसोय टाळण्यासाठी आखणी 9 उत्पादनांच्या बाटलीबंद पाणी विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. हे ब्रँड नियमितपणे तपासले जातात आणि सक्षम प्राधिकरणाद्वारे प्रमाणित केले जातात. प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करूनच रेल्वे स्थानकावर पाण्याच्या बाटल्या विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. अंबरनाथ (मुंबई), भुसावळ आणि इतर ठिकाणी या पाण्याच्या बाटल्यांची विक्री करण्यात येणार आहे. यामुळे उन्हाळ्यात प्रवाशांची पाण्यासाठी गैरसोय होणार नाही. सध्या उन्हाळा असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे.

या पाण्याच्या बाटल्यांना दिली परवानगी
रेल्वेतर्फे मंजूर करण्यात आलेल्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये ऑक्सीमोर एक्वा, रोकोको, हेल्थप्लस, गॅलन्स, निंबस, ऑक्सी ब्लू, सूर्य समृद्ध, एल्विश, इयोनिटा या कंपन्याच्या पाण्याच्या बाटल्या विक्रीस ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.