उच्च माध्यमिक परीक्षेत नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन :

भुसावळ - नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या फेब्रुवारी मार्च २०२३ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकालामध्ये भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन महाविद्यालयाची यशाची उज्वल पंरपरा नेहमीप्रमाणे या ही वर्षी कायम राखली आहे. महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा ९८.०० टक्के, वाणिज्य शाखेचा ९३.०० टक्के, कला शाखेचा ९४.०० टक्के निकाल लागलेला आहे. महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम कोल्हे लोचन सोपान (८६.५० टक्के) व व्दितीय वराडे आचल सुधीर (८५.५० टक्के) तृतीय पटेल सृष्टी सुनिलकुमार (८४.८३ टक्के) तसेच वाणिज्य शाखेत प्रथम नाहर योजन प्रशांत (९३.८३ टक्के) व्दितीय भारंबे वैष्णव निवृत्ती (९३.०० टक्के), व्दितीय पाटील निनाद देवानंद (९३.०० टक्के) तृतीय जैसवाल आस्था महेश (९२.३३) व कला शाखेत प्रथम वासवाणी मुस्कान विजय (८३.०० टक्के) व्दितीय शर्मा मेघराज राजेश (८२.०० टक्के) तृतीय यादव सिमरन राजेश (७९.६७ टक्के) वरील विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतुन महाविद्यालयात अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय आलेले आहेत. तसेच किमान कौशल्य शाखेचा ८३.०० टक्के निकाल लागलेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी मधुन प्रथम न्हावकर आकाश राजु (६०.१७ टक्के), व्दितीय चव्हाण तानाजी काशिनाथ (५५.५० टक्के), तृतीय खरारे वीरकुमार शिवकुमार (५५.३३ टक्के) आणि इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी मधुन प्रथम गायकवाड मयुरी विनोद (५६.१७ टक्के), व्दितीय सपकाळे भुषण प्रदिप (५५.५० टक्के), तृतीय धांडे गौरव विनोद (५३.३३ टक्के) तसेच अकॉउंटीग फायनानशीयल व ऑफीस मॅनेजमेंट मधुन प्रथम पाटील पल्लवी मुकेश (६४.५० टक्के), व्दितीय जगताप महीमा राजेंद्र (६२.५० टक्के), तृतीय सपकाळ माधुरी नरेंद्र (५९.०० टक्के)  
एकंदरीत महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकालाचा विचार करता बरेचसे विद्यार्थी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी मध्ये वाटचाल करणार आहे. तसेच वाणिज्य शाखेतुन बरेचसे विद्यार्थी सी.ए. आणि सी.एस मध्ये वाटचाल करतील. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष  मोहन मोरेश्वर फालक, चेअरमन  महेश देविदास फालक, सेक्रेटरी  विष्णु श्रावण चौधरी, संजयकुमार सुशिलकुमार नाहाटा समस्त संचालक मंडळ, प्राचार्य डॉ.  एस. व्ही. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य . वाय. एम. पाटील, आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे .