भुसावळ – भुसावळ शहर कॉग्रेस कमिटीतर्फे कर्नाटक विधानसभेचा विजयोत्सव साजरा
करण्यात आला . प्रथमतः महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास माजी आमदार निळकंठ फालक, शहर कॉग्रेस अध्यक्ष रविंद्र निकम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व ताजुद्दीन बाबा यांना प्रदेश एस. सी. सचिव भगवान मेढे, प्रदेश अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष मुन्वर खान, शहर सरचिटणीस संतोष साळवे, महिला शहर अध्यक्ष यास्मिन बी यांनी अभिवादन केले.. तसेच जोरदार आतिश.बाजी फटाके फोडुन, मिठाई वाटण्यात आली कॉग्रेस पक्षाचे नेते राहुल जी गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिका अर्जुन खरगे साहेबाची जोरदार घोषणाबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शहर उपाध्यक्ष शैलेंद्र नन्नवरे, अजगर भाई, हमीद शेख, सागर वानखेडे, सेवा दल अध्यक्ष संजय खडसे, सिध्दार्थ सपकाळे, जेष्ठ कार्यकतै जे. बी. कोटेचा, शहर सरचिटणीस संघटन शैलेश अहिरे, सागर कुरेशी, माजी नगरसेवक हाजी न इम पहेलवान,हाजी शरीफ ठेकेदार, शिवसेना तालुका अध्यक्ष संतोष सोनवणे, शिवसेना शहर अध्यक्ष दिपक धांडे, शिवसेना शहर प्रमुख हेमंत खबायंत, राजु इंगळे , राम अवतार परदेसी, इत्यादी कार्यकतै उपस्थित होते .



