बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी काळविटाला मिळाले जीवनदान : ( विहीरीत पडलेल्या काळविटाला अथक परिश्रमानंतर वन्यजीव प्रेमींनी काढले बाहेर )

कुऱ्हा – काकोडा –

कुऱ्हा – काकोडा परिसरातील भोटा शिवारातील एका विहिरीत रात्रीच्या सुमारास काळविट पडल्याचे सकाळी संबधीत शेतकऱ्याच्या निदर्शनास आल्याने त्यांनी वन्यजीव प्रेमींना याची माहिती दिली . यामुळे वन्यजीव प्रेमी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन काळविटाला अथक परिश्रमाने विहीरीतून सुखरुप बाहेर काढले . व निसर्गाच्या सान्निध्यात सोडुन दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा येथील शेतकरी ज्ञानेश्वर गोपाळ लाहूळकार हे नेहमी प्रमाणे सकाळी शेतात गेले असता त्यांन त्यांच्या विहिरीमध्ये काळवीट पडलेले दिसले . त्यांनी लागलीच सामाजिक कार्यकर्ते शैलेश पाटील यांना माहिती दिल्याने त्यांनी लागलीच शिवसेना उपतालुका प्रमुख तसेच सकल मराठा समाज अध्यक्ष नवनीत पाटील व डॉ. गजानन खीरोडकर यांना सदर घटनेची माहिती दिली . त्यांनी तात्काळ वनविभागाचे अधिकारी यांना फोन द्वारे माहिती देऊन सदर टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ४० फुट खोल विहिरीत पडलेल्या काळवीटाला विहिरीतून शेतकरी ज्ञानेश्वर लाहूळकार, शैलेश पाटील, अतुल भगत, सोपान राजगुरे, सतीश फुंडकर, निना गव्हाळे, यांच्या मदतीने व वनविभागाचे कर्मचारी यांनी विहिरीत दोराच्या सहाय्याने उतरून काळवीटाला सुखरूप बाहेर काढले . यावेळी शेतकऱ्यांनी वनरक्षक विजय सुरेश अहिरे, स्वप्नील गोसावी, सुधाकर कोळी, योगेश बोरसे या अधिकाऱ्यांचे आभार मानले .

▪️बुद्ध पोर्णिमेला मिळाले काळविटाला जिवदान▪️
अहिंसेच्या तत्त्वावर शिकवण देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आज (दि.५ ) बुद्ध पोर्णिमा होती . त्यातच भोटा येथील शेतकरी ज्ञानेश्वर लाहुळकार हे नेहमी प्रमाणे शेतात गेले . यावेळी त्यांनी योगायोगाने शेतातील विहीरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहीरीत काळविट पडल्याचे निदर्शनास आले व ते काळविट जिव वाचवण्यासाठी धडपडत असल्याचे पाहुन त्यांना प्राणी दयेचा पाझर फुटला . व त्यांनी ताबडतोब वरील मंडळीना भ्रमणध्वनी माहिती दिल्याने सर्वांच्या मदतीने काळविटाला बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी सुखरूप जिवदान मिळाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले .