जळगाव : मुलाला नोकरी लावून देण्याच्या आमिषाने जळगावातील एका भागातील 40 वर्षीय महिलेवर भुसावळातील एकाने वर्षभर अत्याचार करीत अडीच लाखांच्या रोकडसह दागिणे उकळण्याची घटना घडली. या प्रकरणी पीडीतेने तक्रार दिल्यानंतर रामानंद नगर पोलिसात विनोद रामदास तायडे (रा. भुसावळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
40 वर्षीय पीडीत महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, 1 मे 2022 ते 1 मे 2023 या काळात विनोद तायडे याने पीडीत महिलेच्या मुलाला नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून पीडीतेकडून रोख दोन लाख 50 हजार रुपये उकळले तसेच 15 ग्रॅम वजनाचे दागिने घेतले. तसेच पीडीतेसोबत जवळीक साधत तिच्या मर्जीविरुद्ध वेळोवेळी शारीरीक संबंध करुन प्रस्थापित केले. हा प्रकार जर कुणाला सांगितला तर तुझ्या मुलाला नोकरी लावून देणार नाही, अशी धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडीतेने रामानंद पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.



