दावत-ए-इस्लामी हिंदचा भुसावळ उप कारागृहातील कैद्यांमध्ये ईद मिलन कार्यक्रम


भुसावळ – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दावत-ए-इस्लामी-हिंदच्या तुरुंग सुधारणा विभागांतर्गत भु सावळच्या उप कारागृहात कैद्यांमध्ये ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात दावत-ए-इस्लामीचे वक्ते मुहम्मद शोएब अत्तारी यांनी कैद्यांना नैतिक सल्ला दिला. शिकवणी देताना ते म्हणाले की, कुस्तीमध्ये जो विजयी होतो तो बलवान नसून, रागाच्या वेळी स्वतःवर नियंत्रण ठेवणारा बलवान असतो. कारण रागाच्या भरात माणूस असे काही करतो, ज्यामुळे त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या रागावर नियंत्रण ठेवून नैतिकतेने व चारित्र्याने चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
त्याचबरोबर कारागृह अधीक्षक मा.मानकर साहेब यांनी देखील कैद्यांना येथे नमूद केलेल्या सर्व गोष्टींचे पालन करून एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले, ज्याचा इतर मानवांना फायदा होऊ शकतो. कार्यक्रमाचे शेवटी माजी नगरसेवक साबीर शेख यांनी सर्वांचे आभार मानले
यावेळी दावत-ए-इस्लामी हिंदच्या प्रचार विभागाचे सदस्य श्री रफिक रोशन कादरी हेही उपस्थित होते.