शिवाजी महाराज जयंती निमित्त स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

भुसावळ (प्रतिनिधी )-
मराठा समाज भुसावळ शहर व तालुका तर्फेरांगोळी,निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धाना भुसावळ परिसरातुन उस्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे.आज स्पर्धेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ माता यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात करण्यात आले.भुसावळ मधील विविध शाळेतील विध्यार्थी यांनी निबंध आणि चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता. निबंधा आणि चित्रकले साठी ५ वी ते ७ आणि ८ वी ते १० असे दोन गट करण्यात आले होते.भुसावळ शहरातील सर्व शाळेमधुन निबंध स्पर्धेसाठी ८७० तर चित्रकला स्पर्धे साठी ४७३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.तर रांगोळी स्पर्धेचे आयोजन म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे करण्यात आले होते.त्यात खुल्या गटामध्ये ३८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
झालेल्या निबंध,चित्रकला,आणि रांगोळी स्पर्धेचे निकाल आणि बक्षीस वितरण समारंभ दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज शोभायात्रा समारोप ठिकाणी संत गाडगेबाबा हायस्कूल याठिकाणी होणार आहे.सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रसंगी मराठा समाज तालुकाध्यक्ष किरण पाटील,अड. तुषार पाटील, छावा तालुका अध्यक्ष कृष्णा शिंदे, छावा जिल्हा संपर्क प्रमुख ईश्वर पवार, अलकाताई भगत, नीलिमा जाधव, सहसचिव योगेश जाधव, युवा उपाध्यक्ष हर्षल रंधे, रुपेश पाटील, विजय कापुरे, वैभव गुंजाळ, योगेश मराठे, राहुल पाटील, सचिन पाटील, पवन कलापुरे, धनंजय चव्हाण, गणेश बावडेकर आदी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *