भुसावळ – येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी नुपूर महोत्सव या शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन महाशिवरात्री निमित्त शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. शहरातील डॉ. बी. व्ही. खाचणे हॉल येथे सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल. यात नुपूर अँकॅडमी च्या नृत्यशिशिका चारू भालेराव आपल्या विद्यार्थ्यांसोबत कथक नृत्य सादर करतील. तर नागपूर येथील ऋषिकेश पोहनकर हे भरतनाट्यम या प्रकारात आपली नृत्यासेवा देतील. या वर्षी कार्यक्रमाचे २६ वे वर्ष असून गेली पंचवीस वर्ष हा कार्यक्रम अविरतपणे सुरू आहे. या कार्यक्रमास प्रवेशशुलक नसून सर्व रसिक नागरिकांनी याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ऋषिकेश पोहनकर नागपूर यांना नृत्य श्री पुरस्कार जाहीर
नुपूर महोत्सवात दरवर्षी शास्त्रीय नृत्यक्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या वर्षी नुपूर महोत्सव २३ मध्ये हा पुरस्कार प्रदान केला जाईल. शाल,श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.



