वरणगावला भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन :

वरणगाव – शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वरणगाव सिव्हिल सोसायटीच्या वतीने मॅरोथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
सर्वाच्या उत्तम आरोग्यासाठी या संकल्पनेतून वरणगाव सिव्हील सोसायटीने रन फॉर वरणगाव भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दि १९ रोजी सकाळी करण्यात आले आहे ही स्पर्धा वरणगावच्या उड्डान पुला जवळून सहा वाजेला सुरुवात होणार असून सर्वांसाठी खुली आहे स्पर्धा पाच कि.मी व दहा कि मी अंतराची असणार आहे स्पर्धेत सहभाग घेण्या साठी दि १४ फेब्रुवारी अंतिम असल्याने या स्पर्धेत जास्तीत जास्त तरुण , तरुणीनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले असून विजेत्यांना रोख बक्षीस तसेच दहा लकी ड्रॉ आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रा अनिल शिदे ( ७९७२००४३६३ ) , शरद पाटील ( ८९९९४७६५०१ ) यांच्याशी संपर्क साधावा