भुसावळचा सराईत गुन्हेगार मुकेश भालेराव एमपीडीए कायदयाअंतर्गत स्थानबद्ध :


भुसावळ : भुसावळ शहरातील सराईत गुन्हेगार मुकेश प्रकाश भालेराव यास एमपीडीए कायदयाअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असून नाशिक कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे .
मुकेश प्रकाश भालेराव
(रा. टेक्निकल हायस्कूल मागे भुसावळ, ह.मु. भिलवाडी यावल नाका भुसावळ) याच्याविरुद्ध भुसावळ शहर व भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार आणि दंगा, आत्महत्येचा प्रयत्न करणे, भारतीय हत्यार कायद्याखाली प्रत्येकी एक असे एकुण सात गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्हयांमध्ये वेळोवेळी अटक करण्यात आल्यानंतर तो
न्यायालयातून जामीनावर सुटताच पुन्हा भारतीय दंड विधान, व मुंबई पोलीस कायदा अंतर्गत सराईतपणे गुन्हे करीत
होता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तो व आपल्या सोबत असणाऱ्या गुंडा सोबत घातक शस्त्रे सोबत ठेवून
लोकांवर दहशत व भिती निर्माण करीत होता. त्यास कायदयाचा अजिबात धाक राहिलेला नव्हता त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बाधा निर्माण होवून लोकांच्या मनात असुरक्षीतेची भावना तयार झाली
होती. दिवसेदिवस वेगवेगळ्या तऱ्हेने गुन्हे करण्याची त्यांचे प्रवृत्ती बळावत असल्याने सर्व सामान्य लोकांच्या
जिवीतास तो उपद्रवी बनला होता. त्यामुळे त्याचे विरुध्द महाराष्ट्र झोपडपटटी दादा, हात भटटीवाले औषधी विषयक
गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हीडीओ पायरेट)
यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे बाबत अधिनियम सन १९८१ नुसार ‘धोकादायक व्यक्ती’ या संज्ञेत तो
मोडत असल्याने त्याचे विरुध्द सदर कारवाई करणे आवश्यक होते. त्यानुसार भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस
निरीक्षक, गजानन पडघन यांनी त्याचे विरुध्द चौकशी पुर्ण करुन दि. ११/०१/२०२३ रोजी पोलीस
अघिक्षक जळगांव एम राजकुमार याचे कडेस प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी
करुन पोलीस अधिक्षक यांनी जिल्हादंडाधिकारी यांचे कडेस पाठविलेला होता.
त्यानुसार अमन मित्तल, जिल्हाधिकारी जळगांव यांचे कडील आदेश क्र.
दंडप्र/कावि/एम.पी.डी.ए./३९/२०२३ दि.२३/०१/२०२३ अन्वये सदर अधिनियमान्वये मुकेश प्रकाश भालेराव वय २८
रा. टेक्निकल हॉयस्कूल मागे
सावळ ता. भुसावळ हल्ली मु. भिलवाडी नाका जवळ भुसावळ
जि.जळगाव यास स्थानबध्दतेचे आदेश जारी केलाआहे तसेच
जिल्हादंडाधिकारी मित्तल यांचे आदेशाने मुकेश भालेराव याची मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे रवानगी करण्यात आली आहे.
पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी (जळगाव), अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे (चाळीसगाव), डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे आदींच्या मार्गदर्शनाखाली स्थनिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील, भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. गजानन पडघन यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार युनुस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ जयंत भानुदास चौधरी व भुसावळ शहर पो.स्टेचे पोलीस उप निरीक्षक आसिफ खान युसूफ खान, सहायक फौजदार मोहम्मद अली, पोहेकॉ अनिल चौधरी, पोहेकॉ संजय पाटील, पोहेकॉ सुपडा पाटील, पोना विकास बाविस्कर, पोकॉ भूषण चौधरी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.