भुसावळ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
यांच्या जयंतीनिमित्त
प्रतिष्ठा महिला मंडळ व
जेसीआय भुसावळ ताप्ती
तर्फे आजच्या काळाची महत्वपूर्ण गरज असलेला विषय म्हणजे
सायबर जागरूकता व सतर्कता या विषयावर 3 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजता
तेरापंथ भवन,मातृभूमी चौक जवळ,भुसावळ येथे
व्याख्यान आयोजित करण्यात आले आले.
सुप्रसिद्ध सायबर सुरक्षा तज्ञ तुषार राजू परदेशी प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
ज्यांनी आता पर्यंत 100 च्या वर सेमिनार घेऊन लोकांना सायबर क्राईम वर आपले विचार व्यक्त करून व प्रात्याक्षिके दाखवून लोकांमध्ये सायबर क्राईम पासून कसे सावध राहावे या साठी मार्गदर्शन केले आहे.
तरी सर्वांनी या व्याख्यानचे लाभ घ्यावे व वाढत्या सायबर क्राईम पासून स्वतःचे व आपले मित्रपरिवाराचे रक्षण करावे.
या व्याख्यानास जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान आयोजकांनी केले आहे



