संत बाबा श्रीचंद उदासी यांचा वर्षी उत्सव आजपासून


भुसावळ –

येथील सिंधी कॉलनीत गोविंद धाम येथे पूज्य संत बाबा श्रीचंद उदासी यांचे 16 वे वार्षिक (वर्षी) उत्सव  दि. 30 डिसेंबर ते 1 जानेवारी 23 पर्यंत  साजरा होणार आहे.  तीन दिवस चालणार्‍या सत्संग व प्रवचनात भक्तीगीतेहे आयोजित करण्यात आले आहे. प्रसंगी संत युध्दीष्टीर लाल शदाणी दरबार रायपूर, संत डॉ.गंगादास उदासी हरिद्वार, स्वामी अर्जनदास उदासी अमरधाम उल्हासनगर, संत डॉ.संतोषकुमार अमरावती, संत साई कार्तिक इंदौर आदी संत महात्मा व मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचा सर्व समाज बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय प्रवक्ता दिपक चांदवाणी यांनी केले आहे.