नूतन वर्षा निमित्ताने भुसावळ ते शेगांव पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन ! – 


भुसावळ प्रतिनिधी – दर वर्षा प्रमाणे यंदाही भुसावळ शहरातील ओम गजानन मृत्युंजय ग्रुप श्रीराम नगर , (कोंडेवाडी )भुसावळ यांच्या वतीने नूतन वर्षानिमित्ताने 1 जानेवारी रविवार ते बुधवार दिनांक 4 जानेवारी 2023 ला भुसावळ ते शेगांव पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 1 जानेवारी रोजी सकाळी ठीक 5.30 वाजता श्री गजानन महाराज मंदिर, न्यू म्हाडा कॉलनी वांजोळा रोड भुसावळ येथे भाविकांनी वेळेवर उपस्थित राहावे. नगरवासीयांनी दिंडीच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने हजर राहून या पालखी सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकां तर्फे करण्यात आले आहे.

पायी दिंडी सोहळ्याकरिता माजी नगरसेवक पिंटू भाऊ कोठारी , मा. पुरुषोत्तम नारखेडे, माजी नगरसेवक किरण कोलते, माजी नगरसेवक पिंटू भाऊ ठाकूर, प्रमोद धनगर, दिनेश नेमाडे,मृत्युंजय मंडळाचे अध्यक्ष रवींद्र ढगे, लक्ष्मण बढे, नितीन इंगळे, भूषण झोपे, प्रवीण पवार, अरविंद पवार, गणेश सनांसे, नितीन इंगळे, रवी सिसोदिया, विनय पगारे , राहुल टेन्ट हाऊस, ईश्वर पवार, महेश पाटील, उमेश झोपे, गोविंदा बोरोले, प्रवीण पाटील ,भास्कर पाटील, पंकज पाटील, विनोद पाटील, यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. सदर पदयात्रा मर्यादित संख्येत व निशुल्क सेवा असून नियोजनपूर्वक योग्य व उत्तम सुविधा पुरविता यावी यासाठी भाविकांनी प्रथम नाव नोंदणी करून घ्यावी. तसेच बी. पी, डायबेटीस, हार्ट पेशंट व इतर आजार असलेल्या पेशंटनी पदयात्रेत सहभाग नोंदवू नये. असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. तसेच पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्यांनी सूचनांचे पालन करावे. प्रत्येकाने आरतीच्या वेळी हजर रहावे, दिंडीमध्ये ध्वजामागे राहून अभंग , नामस्मरण करावे. दिंडीमध्ये कुठलेही गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. सर्वांनी चहा नाश्ता, जेवण वेळेवर घेणे ही प्रत्येकाचे वैयक्तिक जबाबदारी राहील.

शेगांव येथे दर्शनानंतर परतीची सोय प्रत्येकांची वैयक्तिक जबाबदारी राहील. सामानासाठी वाहनाची सोय असून आपापल्या सामानावर स्वतःचे नाव ठळक लिहावे. पदयात्रा कालावधीत कुठल्याही नैसर्गिक आपत्तीस आयोजक, कार्यकर्ते जबाबदार राहणार नाही याची प्रत्येकांनी नोंद घ्यावी . सर्व सहभागीं भाविकांनी प्रामाणिकपणे सहकार्याची व सामंजस्याची भावना ठेवून अध्यात्मिक आनंद घ्यावा व सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. पदयात्रेत येताना सोबत दोन पासपोर्ट फोटो सोबत आणावे. नाव नोंदणीसाठी अध्यक्ष जितेंद्र कदम मो.नं 77 76 80 41 92 , उपाध्यक्ष रवि कोळी 8087493738, विनोद बडगुजर खजिनदार 99 75 13 97 17, सह खजिनदार नरेंद्र तळेले 99 21 24 51 66 , ज्ञानदेव काळे सहसचिव, पिंटू काळे सचिव 97 30 55 13 80 , प्रफुल पाटील 99 75 0 6 0 5 1 6 , धनराज चव्हाण, पवन कलापुरे , किशोर झोपे, पदयात्रा व्यवस्थापक रुकेश पाटील, सतीश चौधरी, बाळू चौधरी , माहिती व्यवस्थापक चेतन सरोदे, संदेश पाटील, सुश्रुत झोपे , सूत्रसंचालन व्यवस्थापक नितीन पाटील, चंद्रकांत पाटील, संदीप पाटील, ध्वज व्यवस्थापक ओमप्रकाश काळे, गौरव सोनवणे, भूषण पाटील, सागर पाटील, पालखी व्यवस्थापक अतुल महाजन, विनोद बडगुजर, गिरीष राणे, शिवम चौधरी, जितेंद्र पाटील, साऊंड सिस्टिम व्यवस्थापक मिथलेश चौधरी, प्रकाश सैतवाल, मोनू चंदेलवार, निखिल वारके, हर्षल कदम, चहा नाश्ता व्यवस्थापक किरण पवार, नितीन निलवाणी, जितू महाजन, बापू चौधरी, मयूर चौधरी, गाडी व्यवस्थापन कांतीलाल मामा, कडू पाटील, शुभम मिरगे, शिस्त व नियंत्रण व्यवस्थापक किशोर डोहळे ,संदीप खंडेलवाल, महेश बऱ्हाटे, दीपक चौधरी, पप्पू सवाळे, अक्षय राणे, धीरज झोपे, रुकेश चौधरी, महिला मंडळी संगीता कदम, विद्या काळे, पौर्णिमा पाटील, कोमल बडगुजर, ममता तळेले, काजल पाटील, रेखा कोळी, गुणवंती चौधरी, अश्विनी महाजन, छाया कोळी, निकिता पाटील, मनुश्री झोपे यांच्या सोबत संपर्क साधावा व लवकरात लवकर नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे