प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे पुढील विशेष गाड्यांची मुदत वाढवणार आहे:

ट्रेन क्रमांक 01139 नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष दि. ३१.१२.२०२२ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित असलेली विशेष आता दि. २५.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्रमांक 01140 मडगाव – नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष दि. १.१.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित विशेष आता दि. २६.२.२०२३ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.


