जळगाव –

इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव मार्फत दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यात येत आहे. सदर पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग विकासाच्या अनेकविध सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. दिव्यांगांचे पुनर्वसनासोबत त्यांचे सक्षमीकरण करणे देखील मुलभूत गरज असल्याने, त्यांचे सक्षमीकरणाचे महत्व लक्षात घेता, इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव वतीने जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून शहरातील दिव्यांग महिला व पुरुषांना शिवणकामाचे शास्त्रोक्त पध्दतीचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार देण्यासंदर्भात शिवणकाम स्वयंरोजगार प्रकल्पाची स्थापना करण्यात येत आहे.
सदर प्रकल्पाच्या माध्यमातून दिव्यांग महिला व पुरुष यांना प्रशिक्षीत करुन त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने परीपुर्ण सहकार्य करण्यात येणार आहे. तरी शहरातील इच्छुक व गरजू होतकरु दिव्यांग महिला व पुरुष यांनी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जानुसार पात्र व्यक्तींना प्रशिक्षण नंतर स्वयंरोजगाराबाबत पुढील कार्यवाही केली जाईल. नोंदणीसाठी खालील पत्त्यावर आधारकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रत सह फोटो इ. आणणे आवश्यक आहे.
रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
मायादेवी मंदीरासमोर, महाबळ रोड, जळगाव.
संपर्क: 9325024057


