भुसावळ – माजी खासदार कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व.पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुष्पांजली प्रबाेधनमाला आयाेजित केली आहे. त्यात १२ डिसेंबरला दुपारी ३ वाजता तर १४ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता असे दाेन दिवस अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या सभागृहात वक्त्यांची व्याख्याने हाेतील.

प्रबाेधनमालेचे प्रथम पुष्प १२ डिसेंबरला नागपूर येथील प्रा. विजया माराेतकर या गुंफतील. ‘पाेरी जरा जपून’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. त्यांचे आतापर्यंत या विषयावर असंख्य व्याख्याने झाली आहे. वैचारीक विषयांवर त्यांची ३५ पुस्तके प्रकाशित आहेत. पहिल्या ओबीसी महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. द्वितीय पुष्प १४ डिसेंबर राेजी अकाेला जिल्ह्यातील व्याळा येथील अनंत राऊत हे गुंफतील. ‘आनंदाचे शाेधावे घर दु:खाच्याही छाताडावर’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. कवी, लेखक, गीतकार, माेटीव्हेशनल स्पीकर आहेत. ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’ या कवितेने खेड्यापाड्यातील रसिकांच्या हृदयसिंहासनावर ते अधिराज्य गाजवत आहेत. अशा दाेन्ही वक्त्यांची व्याख्याने बाेचऱ्या थंडीत ऐकण्याची संधी भुसावळकरांना मिळणार आहे. उद्याेजक अजय बढे, अमाेल हरिभाऊ जावळे, यजुवेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनात ही प्रबाेधनमाला हाेत आहे. प्रकल्पप्रमुख म्हणून प्रसन्ना बाेराेले, समन्वयक संजू भटकर, सहसमन्वयक ज्ञानेश्वर घुले आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या कल्पकतेतून हा सांस्कृतिक उपक्रम राबवला जाताे आहे. रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष
दरवर्षी ही प्रबाेधनमाला भुसावळ शहर व परिसरातील शाळांमध्ये फिरती व्हायची. उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शहरात सार्वजनिकरित्या हाॅलमध्ये जाहीर व्याख्यानमाला हाेत नाही. त्यामुळे अभिरूची टिकून राहावी म्हणून या वर्षी ही प्रबाेधनमाला सायंकाळी सभागृहात हाेत आहे, असे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगीतले.
आजपर्यंत यांची झाली व्याख्याने
चांदवडचे विष्णू थाेरे, नाशिकचे प्रमाेद अंबडकर, एरंडाेलचे प्रा. वा. ना. अांधळे, चाळीसगावचे मनाेहर अांधळे, धरणगावचे डाॅ. संजीवकुमार साेनवणे, वाशिमच्या उज्ज्वला माेरे, भुसावळचे जीवन महाजन, पुण्याचे देवा झिंजाड, अमरावतीचे नितीन देशमुख, साेलापूरचे नितीन चंदनशिवे , जळगावचे मनाेज गाेविंदवार, पाचाेऱ्याचे रवींद्र पाटील अशा अनेक दिग्गज वक्त्यांची व्याख्याने या प्रबाेधनमालेत आजपर्यंत झाली आहेत.
नियोजन समिती
प्रदीप सोनवणे, योगेश इंगळे, जीवन महाजन, अमितकुमार पाटील, विक्रांत चौधरी, शैलेंद्र महाजन, समाधान जाधव, भूषण झोपे,अमित चौधरी, राजेंद्र जावळे, राजू वारके, कुंदन वायकोळे, देव सरकटे, प्रा.श्याम दुसाने, निवृत्ती पाटील, जीवन सपकाळे, हरीश भट, संदीप रायभोळे, प्रमोद पाटील, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, मंगेश भावे, राहुल भारंबे ,ललित महाजन, गणेश जावळे


