भुसावळात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त खान्देश स्पोर्टस् क्लबतर्फे ६ रोजी रन फॉर युनीटी स्पर्धेचे आयोजन : स्पर्धेत तीन व पाच किलोमीटरसाठी दोन गट धावणार; नाव नोंदणीस प्रारंभ ; स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन ;


भुसावळ — खान्देश स्पोर्टस् क्लब आयोजित भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४७ वी जयंतीनिमित्त रन फॉर युनीटी ६ नोव्हेंबर रोजी ५ व ३ किलोमीटरसाठी सकाळी स्पर्धेचे आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी स्पोर्टस क्लबच्या सदस्यांकडे नाव नोंदणी सुरु करण्यात आली आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, अशी माहिती स्पोर्टस् क्लबचे योगेश तिवारी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांचे विशेष सहकार्य लाभले असून या रन मध्ये ते स्वत : आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह धावणार असल्याचेही तिवारी यांनी सांगीतले .
परिषदेस आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी नवीन कुकरेजा, राजेश प्रजापती, तुषार सुरवाडे आदी उपस्थित होते.
खान्देश स्पोर्टस् क्लबतर्फे रन फॉर युनीटी ६ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथून मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात येणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. सकाळी साडेपाच वाजता ५ किलोमीटर अंतरात एक गट आंबेडकर मैदान ते नाहटा कॉलेज पर्यंत व तेथून यू टर्न घेवून पुन्हा धावणार आहे. तर सकाळी ६.३० वाजता ३ किलोमीटर अंतरासाठी दुसरा गट आंबेडकर पुतळा ते अष्टभुजा देवी मंदिर पर्यंत धावणार व
तेथुंनपुन्हा यू टर्न घेवून आंबेडकर मैदान वर येईल . स्पर्धा सर्वासाठी खुली असून महिला भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेत सहभागी होवू शकतात . यासाठी फक्त १०० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले असून स्पर्धेत प्रवेश घेणाऱ्या स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी नवीन कुकरेजा-८८०५८५८८०५, योगेश तिवारी-७०५८३५९३२२, राजेश प्रजापती-९३२५०२६००५, तुषार सुरवाडे- ९२२५२२२२९६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन खान्देश स्पोर्टस् क्लबतर्फे करण्यात आले आहे.
खान्देश स्पोर्टस् क्लब रन फॉर युनीटी स्पर्धेतील सहभागी रनरला मेडल, इ -प्रमाणपत्र सोबत रुट स्पोर्ट, गुडी बॅग, नाश्त्याची सोय व दोन सेल्फी पार्इंट राहणार आहे.
तसेच रन फॉर स्पर्धेमुळे शहरात सर्व धर्म समभाव , जातीय सलोखा , एकात्मतेचा संदेश दिला जात आहे . तर कोरोना काळात आपण ज्या परिस्थितीला तोंड दिले यासाठी धावले (रनमुळे ) म्हणजे आपले आरोग्य चांगले राहाते हा संदेश दिला जात आहे .स्पर्धेत अध्ययन पैरामेडिकल मेडिकल कॉलेजचे डॉक्टर सौ वंदना वाघचौरे व पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार आहे .