भुसावळ- प्रल्हाद नगर मधील एन पी नरवाडे रास्त भाव दुकानाच्या संचालिका नंदा नरवाडे यांनी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व प्रतिष्ठीत व्यक्ती यांच्या हस्ते शासनाचा आनंदाचा शिधा या अंर्तगत लाभार्थाना रवा,साखर,पामतेल,चनादाळ व इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी लाभार्थीमधे आनंदाचे वातावरण दिसून आले.होतकरू गरीब महिलांना दिवाळीतील आनंदाचा शिधा वाटप रविवारी केला. विशेष म्हणजे अंध,अपंग,वयोवृद्घ अशांच्या घरी जाऊन नंदा नरवाडे व प्रकाश निकम यांनी शिधा वाटप केले.गरीब लोकांनी यांचे आभार मानले.



