भुसावळ – येथील आर्या फाउंडेशन संचलित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या माध्यमातून एक दिवसीय प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले .
टिंबर मार्केट येथील श्री व्यंकटेश बालाजी मंदिराच्या हॉलमध्ये आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष उमेंद्र वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ऑगष्ट रोजी बालाजी मंदिराचे अध्यक्ष राधेशाम लाहोटी यांनी दीपप्रज्वलन करून प्रथमोपचार प्रशिक्षणाचे उद्घाटन केले.
व्यासपीठावर भुसावळ येथील सुप्रसिद्ध डॉ राजेश मानवतकर , डॉ मधु मानवतकर,सक्षम काऊसिलिंग सेंटरच्या अध्यक्षा सौ आरती चौधरी व सर्पमित्र दीपक नाटेकर , यांचेसह अरुण तायडे, सौ. लता तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती .
आर्या फाउंडेशनच्या संचालिका डॉ. वंदना वाघचौरे यांनी प्रशक्षिण शिबिराची माहिती प्रस्तावनेत देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली .
या वेळी आरती चौधरी यांनी शिबिरात उपस्थित विद्यार्थ्यांना करियर विषयी मार्गदर्शन केले . व योग्य पद्धतिने अभ्यास करुन कसे यश संपादन करावे हे संगीतले .
तसेच डॉ मधू मानवतकर यांनी कोरोना काळात उपलब्ध झालेल्या वैद्यकीय क्षेत्रातील करिअरच्या संधी बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
दुपारच्या सत्रात अवनी बहुउद्देशीय संस्थेच्या
दीपक नाटेकर, धनराज सपकाळे, कल्पेश तायडे, अलेक्झांडर ,रोहित श्रीवास्तव, सोमेश्वर ठाकूर या सर्प मित्रांच्या टीम ने सर्पदंश व त्यावरील प्रथमोपचार व उपाय यावर प्रात्यक्षिक करून दाखवले व मार्गदर्शन केले .
तसेच डॉ राजेश मानवतकर यांनी सध्याच्या धकधकीच्या जीवन शैलीमुळे वाढलेले हृदयविकाराचे प्रमाणआणि त्यावरील उपाय यावर तसेच CPR ( Cardiopulmonary resuscitation) यांचे संपूर्ण प्रात्यक्षिक सह मार्गदर्शन केले ,
या सुंदर प्रशिक्षण शिबिराचे सूत्र संचालन अध्ययन पॅरामेडिकल कॉलज व हॉस्पिटलच्या प्राचार्य
सौ मनीषा बाविस्कर यांनी केले . तर शेवटी अरुण तायड़े यांनी आभार प्रदर्शन केले .
प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वीतेसाठी अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटच्या पोर्णिमा पाटील, प्रशांत सोनार ,कविता जाधव , शुभांगी कोल्हे , सुनिता बागुल, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी प्रजावती तायडे ,ऐश्वर्या सुरवाडे, नकुल ठोसरे ,सायली सावळे ,अश्विनी निकम ,शाहिद खाटीक ,तसेच हिरकणी सदस्य संध्या झाल्टे, वैशाली कोळी, आशा पाटिल,अश्विनी कासार यांनी केले .



