जळगाव – प्रतिनिधी – व.वा.वाचनालयाच्या नूतन सभागृहात आज महापौर संगीत महोत्सवात तब्बल 45 गायक-गायकांनी गीतगायन स्पर्धेत सहभाग घेतला..प्रारंभी नटराज देवतेचे पूजन मुंबई येथील कलावंत सुनील वाघ ,संघपाल तायडे ,ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनचे अध्यक्ष मोहन तायडे, सचिव तुषार वाघुळदे ,जेष्ठ कलावंत विजयकुमार कोसोदे ,हाफीज खान यांच्या उपस्थितीत झाले.

अकोला,मुंबई ,जामनेर, चोपडा, भुसावळ ,रावेर ,मुक्ताईनगर, वरणगाव,फैजपूर, अमळनेर आदी भागातून कलाकार दाखल झाले होते..सायंकाळी भारतरत्न गानकोकिळा लता दीदी यांना श्रद्धांजली कार्यक्रम ” स्वरांजली ” सादर झाला..जळगाव जिल्ह्यातील अनेक दर्दी कलाप्रेमी रसिक- श्रोते यांनी या अवीट गाण्यांचा आस्वाद घेतला.
याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, परेश रिसॉर्टचे संचालक व पत्रकार प्रमोद बऱ्हा टे, परेश बऱ्हाटे,प्रशांत सुरळकर , माजी उपमहापौर सुनील खडके,पोलीस विभागाचे अमित माळी, भास्कर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्या दि.15 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात 11 वाजता पारितोषिक वितरण समारंभ होईल,आणि देशभक्तीपर गीतगायन कार्यक्रम होणार असून या समारंभाला ख्यातनाम वकील पद्मश्री ऍड.उज्वल निकम ,पोलीस अधीक्षक ,डॉ.प्रवीण मुंडे,जिल्हाधिकारी अभिजित राऊत, महापौर जयश्री सुनील महाजन ,केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 12 ते सायंकाळ 5 पर्यन्त होईल.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन तुषार वाघुळदे आणि प्रकाश लोडते यांनी केले.
ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशन आयोजित ” महापौर संगीत महोत्सव ” प्रचंड जोशपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे.
भव्य-दिव्य स्वरूपात हा संगीत उत्सव साजरा होत आहे.
जळगावकरांना नाविन्यपूर्ण उपक्रमाची मेजवानी मिळावी,त्यांना कार्यक्रमाचा आनंद घेता यावा ,रसिकांची गरज पूर्ण व्हावी ,यासाठी हा ” महापौर सांस्कृतिक महोत्सव ” संपन्न होत आहे.
दि.15 ऑगस्ट सोमवारी सकाळी 11 वाजता ” आझादी का अमृत महोत्सव ” या कार्यक्रमाअंतर्गत देशभक्तीपर गीतगायन कार्यक्रम होईल.हा देखणा कार्यक्रम जळगाव येथील महाबळ कॉलनी रोडवरील छत्रपती राजे संभाजी नाट्यगृहात होईल.


