आंतरराष्ट्रीय कथाकार प्रदीप मिश्रा सनातन धर्म रक्षक पुरस्काराने सन्मानित : श्री. नमो विचार मंचचा उपक्रम:

भुसावळ – आंतरराष्ट्रीय कथाकार कथा भूषण परमपूज्य पंडित प्रदीप मिश्राजी यांना श्री नरेंद्र मोदी विचार मंच व साई निर्मल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मध्यप्रदेशातील कुबेरश्वरधाम सीहोर येथे सनातन धर्म रक्षक पुरस्कार 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मूळचे मध्य प्रदेशातील सिहोर या गावातील रहिवासी असलेले भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा गेल्या 18 वर्षांपासून विविध कथा विशेष त : शिव पुराण माध्यमातून संपूर्ण विश्वात प्रत्येक जीवाला शिव बनवून त्याच्यात शिवतत्त्व जागृत करून मुक्तीच्या मार्गाचा संदेश घराघरांमध्ये मना मनामध्ये कथांच्या माध्यमातून पोहोचविण्याच दिव्य कार्य अखंडपणे करीत आहेत आणि यासोबत सनातन धर्म टिकला पाहिजे सनातन धर्माचे विचार संस्कार संस्कृती मानवा पर्यत पोहोचली पाहिजे आणि संपूर्ण जगाला सनातन धर्म कळला पाहिजे यासाठी सुद्धा ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या दिव्य कथांचा जागतिक विश्वविक्रम सुद्धा झालेला आहे. त्यानिमित्ताने त्यांना जागतिक स्तरावर चा पुरस्कार देखील मिळालेला आहे. आणि म्हणून त्यांच्या दिव्य कार्याला बघून श्री नरेंद्र मोदी विचार मंच महाराष्ट्र आणि साई निर्मल फाउंडेशन भुसावळ जिल्हा जळगाव यांच्यातर्फे त्यांना सनातन धर्म रक्षक पुरस्कार 2022 या पुरस्काराने सीहोर मध्य प्रदेश कुबेरश्वर धाम याठिकाणी सन्मानपत्र शाल श्रीफळ, स्वागत माला .देऊनसन्मानित करण्यात आले. याप्रसंगी श्री नमो ( नरेंद्र मोदी )विचार मंचचे कथा साई निर्मल फाऊंडेशनचे संस्थापक शिशिर दिनकर जावळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत सदर पुरस्कार निवड समितीचे प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर पाटील, सह कार्य अध्यक्ष देवेंद्रजी राजपूत, नांदेडचे चिरंजीलाल दीक्षित, यांचेसह श्री विठ्ठल सेवा समिती सीहोर मध्य प्रदेश यांचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वयंसेवक उपस्थित होते.