भुसावळ – येथील भुसावळ कला विज्ञान आणि पुनमचंद ओंकार दास नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालक यांच्या सोयीसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आलेली आहे.
स्वर्गीय नानासाहेब देविदासजी गोविंद फा लक गोविंद यांच्या स्मरणार्थ ,विद्यार्थी माहिती मार्गदर्शन व सहाय्यता केंद्र मार्फत ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली. याचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन भाऊ फालक, प्राचार्य डॉ मीनाक्षी वायकोळे उपप्राचार्य उत्तम सुरवाडे ,पर्यवेक्षक श्रीमती शोभा तळले यांच्या शुभहस्ते नुकताच करण्यात आला.
या हेल्पलाइनमुळे विद्यार्थी आणि पालकांना घरबसल्या प्रवेश प्रक्रिये संबंधीची सर्व माहिती अकरा ते दोन या वेळेत उपलब्ध होणार आहे. कोण कोणती कागदपत्रके प्रवेश घेताना लागतील प्रवेश प्रक्रिया कशी असेल प्रवेश फी किती ,असेल यासारख्या अडचणी दूर करण्यासाठी हे सहायता केंद्र विद्यार्थ्यांना उपयोगाचे ठरणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी8447907917 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कनिष्ठमहाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.



