भुसावळ – भुसावळ मधे गेल्या वर्षी स्थापन झालेल्या जायंटस ग्रुप आँफ वसुंधरा सहेलीचा दुसरा पदग्रहण समारंभ माळी समाज कार्यालयात समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत पार पडला.नूतन अध्यक्षपदी राजश्री बादशहा या नियुक्त झाल्या असून नूतन कार्यकारिणी सदस्यांचे सत्कार स्वागत झाले .
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अनुप जोशी (नाशिक, जायंटस वेल्फेअर फाउंडेशन, फेडरेशन 2-अ) हे उपस्थित होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून रविंद्र जमादार, (स्पे. कमिटी मेंबर जायंटस वेल्फ. फा.), सौ. आरती चौधरी (सक्षम कौन्सिलींग सेंटर), माधव पटेल (मा.अध्यक्ष जा,फेडरेशन 2 अ )
ॲड. संगिता पाटील (उपाध्यक्ष जायंटस वेल्फ. फा.फेड-2अ)
चंद्रकांत सोनार (युनिक डायरेक्टर जा.फे.2-अ )श्री, कौशिक हरसोरा (जा.फे.2 अ फेडरेशन ऑफीसर ) तसेच शहादा जायन्टसचे गणेशभाई पटेल व नरेंद्र बापु पटेल हे उपस्थित होते,
सर्व प्रथम मेंबर्सने सुंदर स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
अँड संगीता पाटील यांनी प्रास्ताविक केले.
जायंटस ग्रुप आँफ वसुंधरा सहलीच्या मावळत्या अध्यक्षा सौ. महानंदा पाटील यांनी संपुर्ण वर्षभराच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. सर्व मेंबर्स ज्यांनी वर्षभरात चांगले काम केले त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी ज्योती पवार व मंदाकिनी केदारे यांनी स्वरचित कविता सादर करून भावना व्यक्त केल्या.
या नंतर मावळत्या अध्यक्षा महानंदा पाटील यांनी जायन्टसची काॅलर गळयात टाकुन व लेबल पिन लावुन पदभार नुतन अध्यक्षा राजश्री बादशहा यांंचेकडे सोपविला.
यानंतर सौ. राजश्री बादशहा यांनी वर्षभरातील कामांचे नियोजन मेंबर्स पुढे ठेवले.
कैलास भावसार ( युनिट डायरेक्टर – जायंटस वेल्फ. फा. फे. 2-अ) यांनी ग्रुप कार्यकारिणीचा शपथविधी केला
सौ. आरती चौधरी यांनी महानंदा पाटील यांच्या कार्याचे कौतूक करून नूतन अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. व भुसावळ छोटे शहर आहे. सर्व मंडळांनी एकत्र मिळून काम केले तर अधिक चांगले कार्य होऊ शकते व भुसावळ साठी एक आदर्श निर्माण होईल असे सांगितले .
रविंद्र जमादार यांनी जायंटस ग्रुपचे कार्य सांगून, शुभेच्छा व्यक्त केल्या
यांनी मनोगत व्यक्त केले, नवीन कार्यकारिणी ला वर्षांच्या कामा साठी शुभेच्छा दिल्या
नविन कार्यकारिणी..
अध्यक्ष राजश्री बादशहा, उपाध्यक्ष वर्षा लोखंडे, उपाध्यक्ष मंदाकिनी केदारे, सचिव अंजली वाघमारे, कोषाध्यक्ष रूपाली पाटणकर, संचालक मंडळ.. मीना राजपुत, निलीमा पाटील, अलका सपकाळे, तिल्लोत्तमा जावळे. दिपाली अहिरे, ज्योती पवार, भाग्यश्री भंगाळे, रेखा सोनवणे, ज्योती पवार,
संस्थापक अध्यक्ष महानंदा पाटील संस्थापक सदस्य… कविता महाले, जोत्स्ना कुलकर्णी, डॉ. वृषाली चौधरी, अनिता ठाकरे, नुतन सपकाळे, सुरेखा राणे, सारिका फालक, शोभा जंगले
नविन सदस्यांचा प्रवेश..
रेखा तायडे, मंगला जंगले, आशा पाटील, सुनंदा शिरसाठ, रीना गायकवाड, नकी खुशलानी, मंगला ढगे, भारती प्रजापती, सारीका पाटील, सुनिता इंगळे, माधुरी गुर्जर, प्रियांका चौधरी



