भुसावळ विभागात तिकीट तपाणी मोहिम सुरु : एकूण 6506 केसेस करून एकूण 46,21,982/- रुपये दंड वसूल :


भुसावळ – भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे प्रबंधक एस एस केडिया यांच्या अध्यक्षतेखाली व भुसावळ विभागाचे मुख्य
विभागीय वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गर्शनानुसार भुसावळ वाणिज्य विभाग व आर पी एक विभाग
यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ विभागात ३० टिम बनवून खंडवा ते इगतपुरी, अमरावती ते भुसावळ चाळीसगाव
जलंब खामगाव विभागात एक दिवसीय तिकीट तपासनी करण्यात आली असून या मोहिमेत एकूण केसेस 6506 केसेस करून एकूण 46 लाख ,21 हजार 982/- रुपये दंड वसूल करण्यात आलाा
यात तिकिट तपासनीस व आर पी एफ यांची संयुक्त ३० टिम तयार करून जवळपास ४६ गाड्या ( अप डाउन ) तपासल्या गेल्या.नाशिक मनमाड, भुसावळ, खंडवा, अकोला, बडनेरा स्टेशनवर चेक केले . भुसावळ स्टेशन वर स्वतः शिवराज
मानसपुरे मुख्य विभागीय वाणिज्य प्रबंधक व क्षितीज गुरव मुख्य विभागीय सुरक्षा कमांडर भुसावळ विभाग हे जातीने
हजर होते.
हि मोहीम यशस्वी पार पाडण्यासाठी भुसावळ विभागाचे वाणिज्य निरीक्षक तिकिट चेकींग निरीक्षक व आर पी एफ
निरीक्षक व स्टाफ यांनी आपले योगदान देऊन भुसावळ विभागासाठी विना तिकीट वसूली करण्यात आली .