पर्यावरण सखी मंच भुसावळ शहरतर्फे वृक्ष संवर्धनासाठी मुलांनी तयार केले सीड बॉल : कार्यशाळा संपन्न : बच्चे मंडळीचा उत्स्फूर्त सहभाग :


भुसावळ – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पूर्वसंध्येला येथील पर्यावरण सखी मंच भुसावळ शहर तर्फे वृक्ष संवर्धनासाठी तसेच लहान मुलांमध्ये सुद्धा वृक्षाची आवड निर्माण व्हावी म्हणून लहान मुलांची मदत घेऊन सीड बॉल बनवण्याची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली .
4जून रोजी सीड बॉल बनवण्याची कार्यशाळा सौ आरती चौधरी कार्यकारी अध्यक्ष यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. प्रसंगी सौ वर्षा कोळंबे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या
यावेळी वृक्ष संवर्धन व लागवडी बद्दल लहान मुलांनी कविता , गाणे , तसेच त्याबद्दलची माहिती सांगितली. यामध्ये मातीच्या गोळ्यांमध्ये विविध वृक्षांच्या बिया टाकून जसे की लीची, गुलमोहर, खजूर, लिंबोणी, चिकू आवळा बेल ,सिताफळ ,फणस, पारिजातक, संत्री, अशा फळांची बी (सीड )जमवून 872 सीड बॉल लहान मुलांनी तयार केले. कार्यक्रमासाठी पाच ते पंधरा वयोगटातील सुुमारेे 22 जन यात अनन्या सैतवाल , किमया निलेश भंडारी ,
तनिष्क निरज अरोरा , आत्मन निलेश नाईक , जिनल पंकज तांबोळी , हंसिका नरेंद्र महाले , नक्षत्रा सतीश महाले
यथार्थ नरेंद्र महाले , सानवी गजानन गवई , खुशी इंगळे
रेवा चेतन फडनविस ,सिदधी कनोजिया ,
रुचा तुशार जंगले , हर्षल उमेश सोनवणे , सई किरोले
, चंदन चौधरी , स्नेहा चौधरी , संकल्प चौधरी , कुणाल उमेश सोनवणे याचे सह मुले आणि मुली सहभागी झाल्या होत्या. पावसाळा सुरू झाल्यावर सर्व सीड बॉल चे जळगाव रोडवरील रस्त्यावर रोपण करणार आहोत असे अध्यक्षा शालिनी वाडेकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या व्यवस्थित नियोजनासाठी उपाध्यक्ष स्वाती भोळे, विजया निकम, शीतल अरोरा, भारती चव्हाण, विद्या पाटील, पूजा मेहता, जया इंगळे, श्रद्धा महाले, जास्वंदी भंडारी, रिता नाईक, वैशाली सैतवाल, प्रज्ञा गवई,प्रचना तांबोळी आधी सख्यांनी मेहनत घेतली. मंडळाच्या तज्ञ मार्गदर्शक सुनंदाताई औंधकर यांचेवतीने मुलांना खाऊ व पेनचे वाटप करण्यात आले. पर्यावरणावर उत्कृष्ट सादरीकरणासाठी आरती चौधरी यांनी मुलांना बक्षिसे सुद्धा दिली . सदर बक्षीसे प्रमुख पाहुण्या यांचे हस्ते देण्यात आली . सीड बॉल बनवतांना मुलांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता .व मुलांच्या पालकांनी आम्हाला पुढील वर्षी सुद्धा सीड बॉल बनवण्याच्या कार्यशाळेसाठी बोलवा असे सांगितले.