5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन : महिला पर्यावरण .सखीमंच व जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी यांची सहविचार सभा संपन्न :


जळगाव – 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील
शहरातील बहिणाबाई उद्यान येथे महिला पर्यावरण .सखीमंच व जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी यांची सहविचार सभा नुकतीच
संपन्न झाली .
यावेळी 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या चित्रकला स्पर्धेची रूपरेषा ठरविण्यात आली यासाठी
जळगाव शहरातील शाळांमध्ये आणि क्लासेस मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे .
सदर बैठकीस महिला पर्यावरण सखीमंचच्या राज्य उपाध्यक्ष मनिषा पाटील,
जळगाव जिल्हा उपाध्यक्ष छाया पाटील सहसंघटक रेणुका हिंगु, सहकोषाध्यक्ष कविता पाटील, कार्यकारणी सदस्य आशा मौर्य, सीमा वाघ, माधुरी शिंपी, शशी शर्मा, रेखा महाजन, काबरा उपस्थित होत्या.
सदर उपक्रमातर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल तरी सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा आणि सहकार्य करावे असे आवाहन मनिषा पाटिल यांनी केले तर प्रस्ताविकात कार्यक्रमाचे रूपरेषा सखीमंच जिल्हा उपाध्यक्ष सौ छाया पाटील यांनी समजावून सांगितली .