श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कोड फँटम’ कोडिंग-डिकोडिंग क्लबची स्थापना :

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात बहुराष्ट्रीय उद्योगांना अपेक्षित कुशल तंत्रज्ञ घडवण्याच्या उद्देशाने कोड फँटम या नावाने कोडिंग-डिकोडिंग क्लब ची स्थापना करण्यात आली.
उद्घाटन प्रसंगी बोलतांना प्राचार्य डॉ आर बी बारजिभे यांनी उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल पाहता प्रत्येक अभियंत्याला आपल्या मूलभूत ज्ञानशाखेतील ज्ञाना बरोबरीनेच कोडिंग ची माहिती व पार्श्वभूमी असणे आवश्यक झालेले आहे. प्रशिक्षण, सराव व अभ्यास ही त्रीसूत्री बदलत्या तंत्रज्ञान काळात अवगत करणे आवश्यक आहे. महाविद्यालयातील सर्वच शाखांमधील अभियंत्यांच्या चौफेर विकासाच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू करून बहुराष्ट्रीय उद्योगधंद्यांना अपेक्षित कुशल मनुष्यबळ उपलब्द करून नौकरीच्या संधी आम्ही निर्माण करत आहोत. कोड फँटम कोडिंग-डिकोडिंग क्लब ची स्थापना हे त्या मार्गावरील महत्वाचे पाऊल असल्याचे सांगितले.
श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात रोबोटिक्स क्षेत्रातील ब्लँका बोट्झ, गज सायबोर्ग तसेच यंत्र व वाहन क्षेत्रातील गियर लॅब असे तंत्रज्ञान क्लब स्थापन आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली नाममुद्रा सुद्धा उमटवली आहे. ह्या गौरवशाली परंपरेचे पालन आणि अपेक्षांवर खरे ठरण्याचे मोठे आव्हान कोड फँटम कोडिंग-डिकोडिंग क्लब समोर असणार असल्याचे समन्वयक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.
कोडिंग चा वापर करून सॉफ्टवेअर, वेबसाइट, मोबाइल ऍप्लिकेशन, गेम्स, इ-कॉमर्स स्टोअर ,ऑनलाईन कंपनी सुद्धा आपण बनवू शकतो. त्यामुळे नौकरीच नाही तर एक उद्योजक घडवण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न असल्याचे तांत्रिक समन्वयक प्रा. ए. पी. इंगळे यांनी सांगितले.
प्रा. अनंत भिडे, प्रा. डि . जी. अग्रवाल, प्रा. ए. पी. इंगळे, प्रा. आर. पी. चौधरी व प्रा. अनिकेत पाठक तसेच धिरज बेहरानी, सायली ब-हाटे,पुजा यादव, अंशीका यादव,मानसी पाल,शहेजाद खान,आदित्य फालक,किरण पाटिल,विशाल पाचपांडे,धिरज पाटिल ह्या विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी परिश्रम घेतले.
हिन्दी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविकांत परदेशी, सचिव श्रीमती. एम.डी.शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडयाले, कोशाध्यक्ष एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, संजय नाहटा, बिसेन अग्रवाल,पंकज संड, यांनी ह्या उपक्रमाचे कौतूक केले.
प्राचार्य डॉ आर बी बारजिभे ,आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रा.अविनाश पाटील, डॉ. एस.बी. ओझा, डॉ.पंकज भंगाळे, डॉ..ए.पी.चौधरी, डॉ.डी.डी.पाटील, डि . जी. अग्रवाल, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर राम अग्रवाल यांची मंचावर उपस्थिती होती.