
भुसावळ : स्वातंत्राचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन जागृती व आयईसी कार्यक्रमांत शालेय विद्यार्थ्यांसाठी कुष्ठरोगाविषयी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना आरोग्य विभागातर्फे पुरस्कार वितरीत करण्यात आले. निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यात तालुक्यातून तळवेल येथील नेहरू विद्या मंदिराची विद्यार्थिनी यामिनी संजय चौधरी हिने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला. भुसावळ येथील के. नारखेडे विद्यालयाची प्रेरणा खगेंद्र चौधरी हिने द्वितीय, वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयाचा वेदांत गुलाबराव धोटे याला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.आर.द वंगे-पांढर े, अतिरिक्त तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप चौधरी, के.एस.येवले, आय.एल.शिंदे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) जिल्हास्तरीय पर्यवेक्षक एन.जे. चौधरी, मुख्याध्यापक साधना लोखंडे, एन.बी.किरंगे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कर्मचारी उपस्थित होते


