मुंबई- थिवि आणि मुंबई- मनमाड उन्हाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ :

भुसावळ – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि थिवि तसेच मुंबई आणि मनमाड दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे.

अ. मुंबई- थिवि उन्हाळी विशेष (२० फे-या)

01045 लोकमान्य टिळक टर्मिनस – थिवि उन्हाळी विशेष ट्रेनला दि. ६.५.२०२२ ते २४.५.२०२२ (१० फे-या) पर्यंत एक दिवसाआड चालविण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे.

01046 थिवि – लोकमान्य टिळक टर्मिनस उन्हाळी विशेष ट्रेनला दि. ७.५.२०२२ ते २५.५.२०२२ (१० फे-या) पर्यंत एक दिवसाआड चालविण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे.

ब. मुंबई – मनमाड उन्हाळी विशेष (९२ फेऱ्या)

02101 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – मनमाड दैनिक विशेष ट्रेनला दि. १६.५.२०२२ ते ३०.६.२०२२ (४६ फेऱ्या) पर्यंत चालविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

02102 मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दैनिक विशेष ट्रेनला दि. १६.५.२०२२ ते ३०.६.२०२२ (४६ फेऱ्या) पर्यंत चालविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

वेळा, संरचना आणि थांबे यामध्ये कोणताही बदल होणार नाही.