महिलेचे छायाचित्र काढले,वरणगावात एका विरूध्द गुन्हा दाखल :

भुसावळ : वरणगाव येथील सिद्धेश्वर नगरातील ३३ वर्षीय महिलेचा पाठलाग करून फोटो काढल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धेश्वर नगरातील रहिवासी महिलेचा एक जण तीन महिन्यांपासून सतत पाठलाग करत होता. चेतन गणेश तायडे (वय ३२) असे त्याचे नाव असून तो वरणगाव येथील वामन नगरातील रहिवासी आहे. १ मे रोजी त्याने महिलेचा पाठलाग करून घराजवळ उभा राहून फोटो देखील काढले. याबाबत पीडित महिलेने वरणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला