अखिल भारतीय विद्यापीठ “मिनी गोल्फ” स्पर्धेत नाहाटा महाविद्यालयाचे घवघवीत यश


भुसावळ – राजस्थान विद्यापीठ जयपूर येथे अखिल भारतीय विद्यापीठ “मिनी गोल्फ” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील खेळाडूंनी उत्तुंग कामगिरी करून महाविद्यालय व विद्यापीठाचे नाव उंचावलेले आहे. यामध्ये कुमारी प्रियंका पाटील व चैतन्य मसराम यांनी सुवर्णपदक पटकाविले असून कुमारी खुशी वाघमारे, कुमारी सोनाली मृणाल सिंग, कुमारी धनश्री सपकाळे यांनी महिला गटात कास्य पदक पटकाविले तर पुरुषांच्या गटात सागर सोनवणे, तुषार जाधव, खेमचंद पाटील यांनीही कास्य पदक पटकाविले.नाहाटा महाविद्यालयातील क्रीडा विभागातील विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस दोन सुवर्ण व सहा कास्य पदक मिळविणे ही पहिलीच बाब असून महाविद्यालयाच्या आणि विद्यापीठाच्या इतिहासात नाव नोंदविलेले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा संचालक डॉ.आनंद उपाध्याय यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.या सर्व विजयी विद्यार्थ्यांचा सत्कार ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री मोहन भाऊ फालक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौ. एम .व्ही.वायकोळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस. व्ही .पाटील डॉ. ए .डी .गोस्वामी, डॉ. बी .एच. ब-हाटे, डॉ. एन.ई.भंगाळे, क्रीडा संचालक डॉ.आनंद उपाध्याय तसेच क्रीडा विभागातील श्री. श्याम भारंबे उपस्थित होते. यावेळी डॉ. मोहन भाऊ फ़ालक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. ताप्ती सोसायटी व महाविद्यालय सदैव आपल्या पाठीशी उभे आहे असेही आश्वासन दिले.