मुंबई आणि मऊ दरम्यान २० साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या :

भुसावळ – मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मऊ दरम्यान विशेष शुल्कासह २० अतिजलद साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः

01051 अतिजलद साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २८.४.२०२२ ते ३०.६.२०२२ (१० फेऱ्या) दर गुरुवारी ०५.१५ वाजता सुटेल आणि मऊ येथे दुसऱ्या दिवशी १२.४५ वाजता पोहोचेल.

01052 अतिजलद साप्ताहिक विशेष मऊ येथून दि. ३०.४.२०२२ ते २.७.२०२२ (१० फेऱ्या) दर शनिवारी ०५.४५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.

थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती स्टेशन, बिना, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन, ओराई, कानपूर, फतेहपूर, प्रयागराज, ग्यानपूर, बनारस आणि वाराणसी.

संरचना: एक प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान आणि गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी.

आरक्षण: विशेष शुल्कासह विशेष ट्रेन क्रमांक 01051 चे बुकिंग दि. २४.४.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.