खंडाळा ता.भुसावळ (हर्षल पाटील) – गेल्या दोन वर्षा पासून जगभरात कोरोना या विषाणू व्हायरसने हाहाकार माजवला होता व सर्वच सण उत्सव यात्रा शासकीय नियमामुळे बंद होते पण आता कोरोनाचे सावट कमी झाल्याने हळूहळू सर्व पूर्व पदावर येत आहे .
या अनुषंगाने तालुक्यातील खंडाळ्यातील नवसाला पावणारी
ग्रामदेवता देवगिर बाबाची यात्रा संपूर्ण तालुक्यात प्रसिद्ध आहे . देवगिर बाबा यांची यात्रा 21 एप्रिल गुरुवार रोजी आयोजित करण्यात आली असून ग्रामस्थानी स्वागतार्थ जय्यत तयारी केली आहे.
ग्रामदैवत देवगिर बाबा यांची यात्रा दरवर्षी भरवली जाते.यात्रा एक दिवसाची असते पण गावाला दिवाळीचे स्वरूप येते यानिमित्त लाखो रुपयांची उलाढाल होते या यात्रेकरीता पंचक्रोशीतील तमाशा प्रेमी लांबून लांबून येत असतात यासाठी खान्देशातील नावाजलेल्यां लोकप्रिय तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात येते .

जागृत ग्रामदेवता देवगिर बाबा यांना भाविक मोठया नवसाने मान मानतात व तो नवस पूर्ण सुद्धा होतो म्हणून नवस (नवसपुर्ती ) फेडण्यासाठी व नवसाचा मान देण्यासाठी भाविक यात्रेला येतात . असे भाविक सांगत असतात .यानिमित्त देवगिरबाबा यांचे मंदिरावर ग्रामस्थांनी रंग रंगोटी करून विद्युतरोषणाई केली आहे .
परंपरे नुसार सर्व कार्यक्रम वेळेवर सुरू होतात .
यात्रा यशस्वितेसाठी गावातील नागरिकांसह , तरुण , महिला भगिनी व पोलीस प्रशासन यांचे सहकार्य लाभत आहे .


