खडका विकासाेच्या निवडणूकीत शेतकरी पॅनलचे वर्चस्व, १३ विजयी


भुसावळ – तालुक्यातील खडका येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक शनिवारी पार पडली, यात शेतकरी पॅनलचे सर्वच १३ सदस्य तेथे निवडून आले आहे, १३ जागांपैकी चार उमेदवार मतदानापूर्वीच बिनविराेध निवडून आले हाेते. शेतकरी पॅनलला बहूमत मिळाल्याने शेतकऱ्यांनी जल्लाेष केला.

येथील विकासाेच्या संचालकांची निवडणूक शनिवारी पार पडली, मतदानानंतर तात्काळ मतमाेजणीला मतदान केद्र असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाली. या निवडणूकीत शेतकरी पॅनल अाणि परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून उमेदवारांनी निवडणूक लढविली हाेती. मतदानांपूर्वीच उज्वला महाजन, वंदना भिरूड, संग्रामसिंग पाटील आणि सुरेश सपकाळे ंहे चार उमेदवार विजयी झाले हाेते. उर्वरित नऊ सदस्यांसाठी मतदान घेण्यात आले हाेते. शनिवारी सकाळी ८ ते ४ या वेळात मतदान घेण्यात आले. यावेळी २८२ मतदारांना मतदानाचा हक्क बजवायचा हाेता. मात्र त्यापैकी सर्व साधारण मतदार संघासाठी २५१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच सात मते बाद झाली. इतर मागासवर्गीयासाठी २५३ मतदान झाले. यात पाच मते बाद झाली. सहकार अधिकारी अरूण नंदवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहीले.

शेतकरी पॅनलचे नेतृत्व माजी आमदार दिलीप भाेळे, सूरतसिंग पाटील, मनाेहर वाणी, धर्मा महाजन, शामसिंग पाटील, केशव धांडे, आनंदा भाेळे, दत्तात्रय भाेळे, गुलाब खाचणे, घनश्याम वारके, भरत भाेळे, लिलाधर भिरूड, सुपडूसिंग महाजन, श्रीधर महाजन, केवल महाजन,भानू महाजन. अादीच्या नेतृत्वाखाली पॅनलची निर्मीती केली हाेती, गेल्या २५ वर्षापासून याच पॅनलचे संस्थेवर वर्चस्व हाेते. व ते अाताही कायमच अाहे. मतदानासासाठी पाेलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फाैजदार धनसिंग राठाेड व अन्य पाेलिसांनी बंदाेबस्त चाेख हाेता

इतर मार्गस वर्गीयांमध्ये चुडामण भाेळे, सर्व साधारण कर्जदार गटात प्रमाेद भाेळे, जयराम महाजन, गजानन सराेदे, मनाेहर सराेदे, अनिल वारके, पुंडलीक वारके, मनाेहर धांडे, शांताराम भारंबे हे विजयी झाले. मतमाेजणी दुपारी चारनंतर सुरू हाेऊन दिड ते दाेन तासातच निकाल जाहीर झाला