दीपनगर येथेअग्निशमन सेवा विभागातर्फे अग्निशमन सुरक्षा सप्ताह साजरा


दीपनगर : येथील अग्निशमन सेवा विभागातर्फे १४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे .
यानिमित्त भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे अग्निशमन विभागा तर्फे वसाहतीतील रहीवासीयांकरीता अग्निशमन उपकरणांचे प्रशिक्षण तसेच एल.पी.जी. प्रतिबंधात्मक उपाय, प्रात्यशिक व प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आले त्यात महिला वर्गाने उस्फुर्त असा प्रतिसाद दिला त्यांत त्यांना किचन ऍप रॉन वाटण्यात आले. तसेच १४ ते २० एप्रिल दरम्यान अग्निसुरक्षितते बदद्ल प्रकल्पात तसेच वसाहती मध्ये व लहान मुलानं करिता विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत.
अग्निशमन विभागाचे उप मुख्य अग्निशमन अधिकारी आर बी आव्हाड ,कनिष्ठ अग्निशमन अधिकारी गायकर, वसावे , डी सी ओ अमोल लांबोळे व अग्निक गिरीश पाटील ,योगेश कचरे, लखन चौधरी, हर्षु काशीकर डी जे पाटील , हर्षल नेमाडे,मनोज भंगाळे अजित वर्मा यांनी परिश्रम घेतले