भुसावळ – इ. स. 14000 वर्षापूर्वी स्थापन झालेले 600 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा प्राचीन इतिहास लाभलेले भुसावळ शहराचे आराध्य दैवत असलेले राममंदिर वार्डातील श्री बडा हनुमान मंदिरात दि. 16 एप्रिल 2022 शनिवार रोजी हनुमान जन्मोत्सव विविध कार्यक्रम आयोजित करुन उत्साहात साजरा करण्यात आला .
हनुमान जन्मोत्सवा निमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दोन वर्षाच्या कोरानाच्या कठिण काळानंतर आता भक्तांमध्ये प्रचंड उत्साही वातावरण आहे . यावर्षी हनुमान जन्मोत्सवाचे आकर्षण म्हणजे भारतात अतिशय दुर्मीळ होणारी हनुमंताची सहस्त्रनाम पुजा व सहस्त्रधारा महाअभिषेक होते . .
या पूजेचे वैशिष्टये म्हणजे या पुजेत 9 जण बसतात हनुमंताच्या 1000 नावाने विविध वस्तूंची यथाशक्ती आहुती दिली जाते. व 1000 धारांनी हनुमंताच्या महाअभिषेक होतो. पहाटे 3.30 वाजेपासून हनुमंताला दुध, दही(,मध) सहद, तुप, साखर, अत्तर, दशमूळ, उसाचा रस, गंगाजल, आदींनी अभिषेक करण्यात आला .
यावेळी मोटू वर्मा, नितीन शर्मा, संकेत अग्रवाल, गोविंदा शर्मा, राजेश अग्रवाल, गोविंद अग्रवाल, महेंद्र चौधरी, योगेश अग्रवाल, मयूर अग्रवाल यांच्या हस्ते श्री बडा हनुमान मंदिराचे मुख्य प्रशांत रामदासजी वैष्णव व जयप्रकाश शुक्ला पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली महाअभिषेक संपन्न झाला . सकाळी सुर्यदयाच्या वेळेस हनुमानाच्या जन्मसोहळा महाआरती झाली. नंतर दिवसभर पंजेरीच्या विशीष्ट प्रसादाचे वाटप करण्यात आले सकाळी महाआरती नंतर हनुमंताला छप्पन भोगाचे आयोजन करण्यात आले . सर्व भाविकांकडून सव्वाकिलो प्रसाद या प्रमाणे 56 भाविकांकडून विविध प्रकारच्या मिठाई, र्ेंळे, सुकामेवा, नमकीन आदींचा भोग हनुमंताला दाखविन्यात आला .
दरम्यान सायंकाळी 6 वाजता हनुमान जन्मोत्सवाची नगर भ्रमण भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकित श्रीराम ,लक्ष्मण , सीता , हनुमान यांची सजिव आरास लक्षवेधी ठरली .
शहरातील तसेच परिसरातील हनुमान भक्त मोठ्या संख्येने या मिरवणूकीत सहभागी झाले
सोहळा यशस्वितेसाठी श्री. बडा हनुमान मंदिराचे महंत प्रशांत रामदासजी वैष्णव, संतोष टाक, अशोक धांडे, पं. रवि ओम शर्मा, रमेश इखनकर, श्रीकृष्ण चोरवडकर, गोकुळ अग्रवाल, यशवंतसिंग चौधरी, गणेश गुरव, अक्षय वर्मा, पवन दरगड, विश्वज्योती मंडळ, अलंकर मंडळ, चेतना मंडळ, आपले मंडळ, उपकारमंडळ, जयलेवा गृ्रप, सामाजिक कार्यकर्ते जे. बी. कोटेचा, दिनेश महाजन, अजय पाटील, सचिन पाटील, बबलू बर्हाटे, उमाकांत शर्मा, इखनकर बंधऊ, अमोल सोनार, चेतन शिरनामे,रोहीत नेमाडे, सागर शिंदे, धनराज सोनार, सोमनाथ चौरसिया, चिंटू झंवर, हरी तिवारी, सोनू शेठ, राममंदिर वार्ड, व विठ्ठल मंदिर वार्डातील संपूर्ण कार्यकर्ते व मंडळ तसेच श्रीमती विमल रामदास वैष्णव, मेघा वैष्णव,भारती वैष्णव, रितीका चौरसिया, पुजा गुरव, उमेश नेवे, राजश्री नेवे आदींनी परिश्रम घेतले



