भुसावळ – शहरातील सराफ बाजारात दिगंबर जैन महिला महासमितीतर्फे पाणपाेईचे उदघाटन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या संचालिका रजनी सावकारे अाणि जैन मंदीराचे अध्यक्ष सतीश साखरे यांच्या हस्ते करण्यात अाले.

दिवसे दिवस वाढत असलेल्या तापमानामुळे घशाला काेरड पडत असल्याने अनेक जणांना पाणी मिळत नाही, त्यामुळे दि. जैन महिला महासमितीच्या सदस्यांनी वर्गणी जमा करून पाणपाेई सुरू केली. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना पिण्यास पाणी मिळत नसल्यान ेपाण्यासाठी त्यांची वणवण हाेत असते, त्यामुळे सराफ बाजारातच पाण्याची व्यवस्था करण्यात अाली अाहे. उन्हातून अालेल्या नागरिकांना गार पाणी तेथे मिळणार अाहे. पाण्यासारखे पुण्य नाही त्यासाठी पाण्याची तहान भागावी यासाठी पाणपाेई सुरू करण्यात अाल्याचे महिला सदस्यांनी सांगितले.
यावेळी मंडळाच्या अध्यक्षा शाेभा राजणे, उपाध्यक्षा संगिता साेनटक्के, संचालिका पुष्पा सैतवाल, सचीव सुषमा काळे, कीरण चतुर, काेषाध्यक्ष प्रतिभा मुळकुटकर, सविता सुलाखे, वैशाली सैतवाल, निशा जैन, सल्लागार मंगला सुलाखे, सदस्य दिपाली साखरे, मनिषा काळे, प्रांजल सताेषे, वनिता वास्कर, विदया जैन, अंकीता राजणे, विधी जैन, विना जैन, विद्या मुळकुटकर, वैशाली भाकरे, अर्चना भाकरे, सराेज पांडव, छाया अवतारे, जिनामती पांडव, सुशिला अांबेकर, सुनीता दाेशी अादी उपस्थित हाेते. यावेळी महेद्र जैन यांचे सहकार्य लाभले.


