महामानव डॉ आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करा ,मात्र नियमांचे पालन करा : भुसावळात अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी –


भुसावळ – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निश्चितपणे उत्साहात साजरी करा मात्र मिरवणुकीचे पावित्र्य राखा ,नियमांचे पालन करा ,असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी येथे केले.

 मंगळवारी शहरातील प्रभाकर हॉलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त समिती अध्यक्ष, सदस्य व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक  सायंकाळी झाली. याप्रसंगी ते बोलत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षानंतर मिरवणुकीला परवानगी मिळत असल्याने यंदा भीम सैनिक व तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
यावेळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी प्रास्ताविक केले. जगन सोनवणे, विनोद सोनवणे, रीपाईचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, सुदाम सोनवणे, गणेश सपकाळे, शरद सोनवणे, रूपेश सांळुखे यांनी मनोगत व्यक्त करीत, जयंतीच्यानिमित्ताने सूचना मांडल्यात. रात्री उशीरापर्यत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवावा, अश्या सूचना केल्यात.
यावेळी मार्गदर्शन करतांना अपर अधीक्षक गवळी म्हणाले की ,
डॉ.आंबेडकरांमुळे आपल्याला जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे तेजस्वी व्यक्तीमत्व होते. अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासांठी डॉ.आंबेडकर हे आपल्या रक्तात तळपत आहे. डॉ.आंबेडकर यांची ग्रंथ संपदा मोठी आहे, प्रत्येकाने दररोज झोपण्यापूर्वी एका पुस्तकाचे एक पान तरी वाचून झोपावे असे त्यांनी सागितले. कोरोनाच्या दोन वर्षानंतर प्रथमच मिरवणूक निघत आहे. असे अपर अधीक्षक गवळी म्हणाले.
सूत्रसंचालन शहरचे पोलिस निरीक्षक गजानन पडघाण तर आभार बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड यांनी मानले. यावेळी पदाधिकार्‍यांनी मांडलेल्या समस्या दूर करण्यावर भर राहिल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. व्यासपीठावर वीज कंपनी, पालिका प्रशासन, पोलिस अधिकारी उपस्थित होते.